प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेकडून कर्तृत्वान महिलांचा पुरस्काराने सन्मान : सुमित डान्स अकॅडमीच्या जागर स्त्री शक्तीच्या कार्यक्रमाने उलगडला स्त्री शक्तीचा प्रवास 

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समिती , दीनदयाळ अंत्योदय  योजना,राष्ट्रीय उपजीविका अभियानाकडून मंगळवारी समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्व्हेक्षण तसेच शून्य कचरा व्यवस्थापन अंतर्गत हा कार्यक्रम संपन्न झाला. आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील आणि टीमने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सुमित डान्स अकॅडमीच्या जागर स्त्री शक्तीच्या कार्यक्रमाने स्त्री शक्तीचा प्रवास आपल्या नृत्य अभिनयातून उलगडला. तर ए शाम मस्तानी सिंगिंग ग्रुपकडून महिलांसाठी कराओके गाण्यांचा कार्यक्रम तसेच मिमिक्री आणि डान्स कार्यक्रम संपन्न झाला.        महिला दिनानिमित्त महापालिकेकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कॅण्डल मार्च, आदर्श स्त्रियांच्या प्रतिमा पूजन, प्रसूतिगृहातील मुली जन्माचे स्वागत तसेच आशा वर्कर यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. बुधवारी भावे नाट्यगृहात महिला नगरसेविका, अधिकारी , कर्मचारी, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी यांच्यासाठी महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि कर्तृत्ववान महिलांना पुरस्काराने सन्मनींत करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन गटनेत्या भारती दिगडे, उपायुक्त स्मृती पाटील आणि महिला बालकल्याण सभापती अस्मिता सलगर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सुमनताई सुरेश खाडे यांच्याहस्ते अनेक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी सौ. मंजिरी गाडगीळ, माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक संगीता खोत, अनारकली कुरणे, सविताताई मदने, मदिना बारूदवाले, गीतांजली ढोपे पाटील , आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सहायक आयुक्त अशोक कुंभार, अग्निशमन अधिकारी विजय पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दीपक चव्हाण यांनी राज्यगीत सादर केले. त्यानंतर सुमित डान्स अकॅडमीच्या जागर स्त्री शक्तीच्या कार्यक्रमाने स्त्री शक्तीचा प्रवास आपल्या नृत्य अभिनयातून उलगडला. यानंतर समाजातील विविध स्तरात उल्लेखनीय कामगिरी बजावत असणाऱ्या महिलांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये पत्रकार शर्वरी पवार, प्रबोधिनी  चिखलीकर, धैर्या भाटे, स्वाती कोल्हापुरे, संगीता पटवर्धन, अंजली केळकर, उज्वला चौधरी, सुरेखाताई सातपुते, अपर्णा गोसावी, प्राची कुदळे, मीनल कुडाळकर, रेखा पाटील, मंगल वैद्य, राजलक्ष्मी साबणे, वर्षा कोपर्डे, उत्प्रेक्षा नवलाई , चंदना देशंपाडे  यांचा आदर्श महिला पुरस्कार तर दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियानात उल्लेखनीय काम केल्याबद्दल कुसुम कांबळे, वैशाली कदम, कविता साळवे, शारदा वडर , मोनिका शिंदे, अरुणा साखळकर आणि सोनम घाटुल यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे फायरमन म्हणून रुजू झालेल्या पहिल्या फायरमन श्वेता गायकवाड हीच विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर सांगलीतील ए शाम मस्तानी सिंगिंग ग्रुपकडून दीपक चव्हाण आणि सोनाली केकडे यांनी महिलांसाठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर केला तर महमंदरफिक भालदार यांनी वेगवेगळ्या कलाकारांच्या आवाजात मिमीक्री सादर करीत सर्वांचे मनोरंजन केले.  तर महापालिका कर्मचारी सीमा बारस्कर, पूर्वा केकडे, चव्हाण, श्रेया गायकवाड यांनीही नृत्ये सादर करीत सर्वांची मने जिंकली. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी सर्वाना माझी वसुंधरा अभियानातंर्गत वसुंधरा रक्षणाची शपथ दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर दीपक चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन स्मिता वाघमोडे, ज्योती सरवदे, वंदना सव्वाखंडे , संपदा मोरे, शाहीन शेख , रोहिता कांबळे यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.