प्रतिष्ठा न्यूज

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची 26 मार्च रोजी लोहा येथे जाहीर सभा- राष्ट्रवादीचे माजी आमदार धोंडगे भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : “आबकी बार किसान सरकार” चा नारा देत तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी काही दिवसांपूर्वीच नांदेड शहरात भव्य सभा घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा ते नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे दि.26 मार्च 2023 रोज रविवारी जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत शेतकरी नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे हे भारत राष्ट्र समिती या पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ.शंकरअण्णा धोंडगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर धोंडगे यांनी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची भेट घेतली असून त्यांनतर लोहा येथील सभेचे नियोजन करण्यात आले आहे. लोहा शहरात के.चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा दि.26 मार्च 2023 रविवार होणार आहे.
लोहा शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी ही माहिती दिली. यावेळी माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे, दत्ता पाटील पवार, शिवराज धर्मापुरीकर, मनोहर पाटील भोसीकर, प्रल्हाद फाजगे, प्रविण जेठेवाड आदी उपस्थित होते.
शेजारच्या तेलंगणा राज्यात शेतकरी, शेतमजुर, कामगार, कष्टकरी, व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी राबविलेल्या विविध धोरणामुळे तेथील ग्रामीण अर्थव्यवस्था आजघडीला भक्कम झाली आहे. महाराष्ट्र राज्यातही तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील समाजाला न्याय मिळावा यासाठी पुन्हा एकदा शेतक-यांना संघटीत करणार असल्याची माहिती यावेळी शेतकरी नेते तथा माजी आ.
शंकरअण्णा धोंडगे यांनी यावेळी दिली.
पुढे बोलताना माजी आ.धोंडगे म्हणाले, शेतक-याचे हिताचे करत असलेले तेलंगाना मॉडेल कसे आहे याची माहिती आपल्या भागातील जनतेला व्हावी म्हणून भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची दि.26 मार्च रोजी रविवारी लोहा येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सदरील सभेस लोहा- कंधार तालुक्यातील जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सभेचे आयोजक माजी आ.शंकरअण्णा धोंडगे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.