प्रतिष्ठा न्यूज

उमरा येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात या निमित्ताने 31 मार्च भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : – लोहा तालुक्यातील उमरा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही जगद्गुरू राष्ट्रसंत संत तुकाराम महाराजांच्या बीज मुहूर्तावर हभप वै.संभाजीमामा महाराज मारतळेकर व हभप वै.धर्मभूषण वटेमोड महाराज सिद्धतीर्थ धाम हाळदा यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यास दि.27 मार्च 2024 रोजी सुरुवात झाली असून हा सप्ताह कार्यक्रम दि.3 एप्रिल 2024 पर्यंत चालणार आहे. या सप्ताह निमित्ताने दि.31मार्च रोज रविवारी सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सन 1973 व्या वर्षी हभप वै. संभाजीमामा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचे हे 52 वे वर्षे चालू आहे. या सप्ताहात मराठवाड्यातील नामवंत कीर्तनकरांचे कीर्तन होत असतात. या सप्ताहातील दैनदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकडा आरती, काकडा सकाळी 7 ते 9 गाथा पारायण, दुपारी 10 ते 12
गाथा भजन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 9 ते 11 हरीकिर्तन व नंतर जागर हे कार्यक्रम नित्यनेमाने होत आहेत. शेवटी दि.3 एप्रिल रोजी काल्याचे कीर्तन सकाळी 10 ते 12 या वेळात हभप.व्यंकट महाराज दगडवाडीकर यांचे होणार आहे. या कार्यक्रमास उमरा परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच यावेळी गावातील नवयुवकांच्या वतीने दि.31मार्च रोज रविवारी सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी- मा.मोहनराव पाटील हे राहणार आहेत तर उद्घाटक म्हणून- मा.डॉ.सचिन पाटील उमरेकर व प्रमुख पाहुणे म्हणून- मा.चंद्रकांत पवार (सहायक पोलिस निरीक्षक उस्माननगर ठाणे) मा.सतीश व्यवहारे (गटशिक्षणाधिकारी लोहा) मा.साईनाथ पवार(सरपंच) मा.स्वप्नील पाटील उमरेकर(उपसरपंच) मा.आनंदराव सिरसाट(पोलीस पाटील) मा. बाबाराव पाटील मुकादम (तंटामुक्ती अध्यक्ष) सह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत. या रक्तदान शिबीरासाठी जिजाई ब्लड सेंटर नांदेडचे सहकार्य लाभणार आहे. तरी परिसरातील तरुणांनी रक्तदाना सारख्या राष्ट्रीय व सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन समस्त गावकरी उमरा यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.