प्रतिष्ठा न्यूज

श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात “हिंदू एकता आंदोलन” संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा…* -हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीने श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या लढ्यामध्ये सहभाग घेतलेल्या हिंदू एकता आंदोलनाच्या  कारसेवकांचा सत्कार सोहळा मिरज येथील हिंदमाता चौकात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्री नितीनजी शिंदे म्हणाले की, विश्व हिंदू परिषदेने पुकारलेल्या श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या लढ्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, धुळे, नाशिक या जिल्ह्यातील हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यासाठी ते आघाडीवर होते. त्यामुळेच त्यांचे हे योगदान कदापि विसरता येणार नाही. या कार्यक्रमामध्ये सुरेश शेळके, विनायक शिंगाणा, शहाजी कांबळे, संजय धामणगावकर या कारसेवकांचा भगवी शाल- श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच *लव जिहाद प्रकरणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एका युवतीची सुटका* करण्यात प्रमुख सहभाग घेतलेल्या हिंदू एकता आंदोलनाचे अमित सूर्यवंशी व अशोक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजू जाधव शहर जिल्हा उपाध्यक्ष, अवधूत जाधव खणभाग विभागाध्यक्ष, अनिरुद्ध कुंभार सांगलवाडी विभागाध्यक्ष, रविंद्र पवार व श्रीकांत चोरगे मिरज शहर उपाध्यक्ष यांच्या निवडीची पत्रे देण्यात आली. प्रास्ताविक हिंदू एकताचे ज्येष्ठ नेते दत्ताअण्णा भोकरे यांनी केले व हिंदू एकता आंदोलनाचे ज्येष्ठ नेते श्री.किशोरदादा जामदार, अनिलअण्णा रसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.जमलेल्या सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे स्वागत माजी जिल्हाध्यक्ष परशुराम चोरगे  यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपात हिंदू एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी आभार मानले. यावेळी विष्णूपंत पाटील, पै.विजय टोणे, अमित सूर्यवंशी, अशोक पाटील, श्रीनिवास नाझरे, सोमनाथ गोटखिंडे, राहुल जाधव, प्रकाश भोसले, मोहन व्हनखंडे सर, दिगंबर जाधव, शिवाजी दुधाळ, सूर्यकांत शेगणे, शशिकांत वाघमोडे, बाळासाहेब मुठेकर, डॉ.भालचंद्र साठ्ये, मोहन वाटवे आदि उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.