प्रतिष्ठा न्यूज

तासगावात मराठा एकजुटीचा विजय असो म्हणत भव्य बाईक रॅली… गुलाल उधळत मनोज जरांगेंचा जयजयकार…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव:सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेला आरक्षणा बाबतचा लढा मुख्यमंत्र्यांकडून जीआर निघाल्यानंतर थांबवण्यात आला असून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत दिलेल्या लढ्याचा आनंद साजरा करत गुलालाची उधळण करत तासगावात बाईक रॅली मोठया उत्साहात पार पडली.तासगाव शहरातील प्रमुख मार्गावरून बाईक रॅली जात असताना चौका चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है.., मराठा एकजुटीचा विजय असो… अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.वरचे गल्ली जिजाऊ चौक येथून निघालेली बाईक रॅली शिवतीर्थ तासगाव येथे पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.यावेळी समन्वयक शरद शेळके,विक्रांत पाटील,विशाल शिंदे आदींची भाषणे झाली.भाषणा दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना श्रीकृष्ण व श्रीराम यांची उपमा देण्यात आली.यावेळी मराठ्यांसाठी लवकरच एक कार्यशाळा घेऊन यामध्ये आरक्षणाबाबतची तांत्रिक माहिती देण्यात येणार असून सकल मराठा समाजाने कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.दरम्यान,शिवतीर्थावर मान्यवरांची भाषणे सुरू असताना कुटुंबासोबत चार चाकी मधून प्रवास करणाऱ्या प्रभाकर बाबा पाटील यांनी चालत्या गाडीतून हात उंचावत मराठा कार्यकर्त्यांना पाठिंबा दर्शवत लक्ष वेधून घेतले.यावेळी सकल मराठा समाज तासगाव शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली, पुढील काळात मनोज जरांगे-पाटील यांच्या सोबत राहून त्यांच्या आदेशानुसार पुढील भूमिका घेणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.