प्रतिष्ठा न्यूज

उत्कृष्ट संगणक मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून लिंबगावचे- बिएलओ उध्दव कदम यांचा जिल्हाधिकारी यांचे कडुन गौरव

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : तालुक्यातील लिंबगाव येथील 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील यादी भाग क्रमांक 170 चे ( बिएलओ ) मा.उध्दव रंगनाथराव कदम, (सहशिक्षक- सहकार महर्षी शामरावजी कदम प्राथमिक शाळा, लिंबगाव) यांना दि. 25 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट संगणक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ विष्णुपुरी येथे अप्पर जिल्हाधिकारी- मा.पी एस.बोरगावकर, उपविभागीय अधिकारी- मा.विकास माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी- श्रीमती संतोषी देवकुळे, स्वामी रामानंद विद्यापीठाचे कुलगुरू- मा.उध्दवराव भोसले, नांदेडचे तहसीलदार- मा.किरण आंबेकर, नायब तहसीलदार- मा.मुगाजी काकडे, मतदान नोंदणी अधिकारी- मा.ब्रिजेश पाटील, विध्यार्थी विकास विभागाचे संचालक- डॉ.प्रकाश जाधव, मंडळाधिकारी- शिंदे साहेब, तसेच नबीसर, रेड्डीसर, नरवाडे मॅडम आदींच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

तसेच यापूर्वी ही उध्दव रंगनाथराव कदम यांना नांदेड तहसीलचे तहसीलदार- मा.किरण आंबेकर व इतर आधिकारी यांचे कडुन उत्कृष्ट बिएलओ म्हणुन यथोचित सत्कार करून गौरव करण्यात आला आहे.
यावेळी नव मतदार अभिनव कदम, ज्ञानेश्वर वाघमारे, वैभव वाघमारे, यांना कार्डाचे वाटप करण्यात आले.
या गौरव पुरस्कार संदर्भात उध्दव कदम यांना प्रतिक्रिया विचारले असता पहिल्यांदा हे काम अवघड (किचकट) वाटते, परंतु या कामाची पद्धत समजुन घेतल्यास हे काम करणे अवघड जात नाही, खुप सोपे जाते असे मला वाटते, त्यासाठी “केल्याने होते रे,आधी केलेची पाहिजे” असेही कदम यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले.

 

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.