प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीवाडी येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन : शहर-जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज यांची माहीती

प्रतिष्ठा न्यूज
सागली प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.आ.जयंतराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीवाडी येथे भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दरवर्षी या महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हे महाआरोग्य शिबिर सागलीवाडी येथील ल.पा.पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये रविवार दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी घेण्यात येणार आहे.

माजी नगरसेवक हरिदास पाटील,सागलीवाडीचे युवा नेते अभिजित कोळी यांच्या पुढाकाराने घेण्यात येणार आहे.

गतवर्षी या महाआरोग्य शिबिरातून जवळपास 19000 हजार रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली होती.

आत्तापर्यंत मोतीबिंदू ऑपरेशन 3500,रेटीना ऑपरेशन 750,कानाचे मशिन वाटप 460,लहान मुलांचे हार्ट ऑपरेशन 145,किडनी ट्रान्स्फर 06,ॲक्सिडेंट ऑपरेशन 155,प्लॅस्टिक सर्जरी 73,मूतखडा ऑपरेशन 174,स्वादुपिंड ऑपरेशन 85,सोनोग्राफी,एक्स रे 4300 ,एंजिओग्राफी 1450 ईतक्या करण्यात आले आहेत.

यावर्षी होणार्या शिबिरामध्ये कॅन्सर,प्लॅस्टिक सर्जरी,ह्रदयाचे आजार,पोटाचे विकार ,हाडाचे शस्त्रक्रीया,मुतखड्याचे विकार,स्त्रीरोग तपासणी,दंत,कान,नाक,घास,त्वचारोग,व लहान मुलांची तपासणी करण्यात येणार आहे.

तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया , चष्मे,श्रवणयंत्र,औषधे ईत्यादींचे वाटप करण्यात येणार आहे.

ईसीजी एक्सरे,व ॲजिओग्राफी या विशेष मोफत सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या शिबिरासाठी आदीत्य हाॅस्पीटल,मेहता हाॅस्पीटल,कुल्लोळी हाॅस्पीटल, सिनर्जी हाॅस्पीटल, सेवासदन हाॅस्पीटल,शारदा हाॅस्पीटल,साईहार्ट सेंटर,लायन्स हाॅस्पीटल, कोकीळाबेन अंबानी हाॅस्पीटल, फोर्टीज हाॅस्पीटल, सेवन हिल्स हाॅस्पीटल,यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

यावेळी शहर-जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज,युवक शहर-जिल्हाध्यक्ष राहुल पवार,महापौर दिग्विजय सूर्यवंशी,माजी नगरसेवक हरिदास पाटील,अभिजित कोळी,राष्ट्रवादी डाॅ.पृथ्वीराज पाटील,डाॅ.शुभम जाधव,निलेश शहाआयुब बारगीर,उमर गवंडी,किशोर हत्तीकर,तौसीफ मुनशी ,मदन पाटील,अपर्णा कदम , सुरेखा सातपुते,अमृता चोपडे, अमित चव्हाण, आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.