प्रतिष्ठा न्यूज

तासगाव मध्ये सोमेश्वर मंदिराचे कलशारोहण व प्राणप्रतिष्ठापना

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव शहरातील  ऐतिहासिक सोमेश्वर महादेव मंदिराच्या कलशारोहण व  प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी 22 मार्च व 23 मार्च रोजी  करण्यात आले आहे.श्री प्र ब्र 108 श्री महादेव शिवाचार्य महाराज( वाईकर ), प पु शिवयोगी सिद्धलिंग महाराज गोवसिद्ध मंदिर जुना पन्हाळा,ज्ञानी 108 शिवानंद शिवाचार्य वाळवेकर महाराज,स्वामी शशिकांत जंगम, अनिकेत हिरेमठ,विश्वेश्वर स्वामी,महेश स्वामी,अवधूत हिरेमठ,यांच्या मार्गदर्शनाने व नियोजनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.22 मार्च रोजी दुपारी दोन ते पाच तासगाव शहरातून मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा पार पडणार आहे, सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत कलश संस्कार विधी धान्य दिवस जलाधिवास निद्राधिवास विधी पार पडणार आहे.23 मार्च रोजी सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत होम हवन कलशारोहण व मंगलआरती पार पडणार आहे. दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री सोमेश्वर देवस्थान व्यवस्थापन समिती डबास गल्ली यांनी दिली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.