प्रतिष्ठा न्यूज

नांदेड (वजिराबाद) ट्रॉफीक विभागाचा अभिनव उपक्रम- ट्रॉफिक समस्यांसाठी दिला व्हाट्सअप नंबर

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : नांदेड शहरामध्ये काही वेळा काही ठिकाणी ट्रॉफीक जाम होत असते, रत्यामध्ये वाहन उभे केल्याने, दुकानाचे सामान लावल्याने, हातगाडयामुळे किया इतर रस्त्यात लावलेल्या दुकानामुळे तसेच दुकानाच्या बोर्ड मुळे, मोकाट जनावरांमुळे, रोग साईड गाडी टाकल्याने व इतर अशा कारणामुळे ट्रॉफीक जाम होते. तसेच शाळा, कॉलेज, क्लासेस परिसरामध्ये रोड रोमिओ किव्हा चिडीमारी करणारे, सतत परिसरांमध्ये विनाकारण फिरणारे एखाद्या विशिष्ट पॉईंट वर थांबून छेड काढणारे या बाबत माहीती. तसेच नांदेड शहरांमध्ये रेसिंग करणारे, रेस लावणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणारे, ज्या पालकांची मुले पालकांनी सांगुनही ऐकत नाहीत नंतर त्यातून एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते या बाबी रोकनेसाठी. रोडवर अचानक धोकादायक पडलेला गड्डा असेल मोठया नालीला झाकण नसेल किंवा अशा ज्या बाबी मुळे अपघात घडून येऊ शकतो अश्या बाबी. वरील अशा सर्व ट्रॉफीक समस्या बाबत सामान्य नागरिकाला अनेक वेळा समस्या भेडसावत असतात, पण या छोटया समस्येसाठी नागरीक, पोलीस स्टेशन किव्हा ट्रॉफीक कार्यालयापर्यंत पोहोचणे सोयीचे नसते, त्यामुळे शहर वाहतूक शाखा वजिराबाद नांदेड यांनी मा.पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने तसेच अप्पर पोलीस अधीक्षक व होम डिव्हायएसपी मॅडम यांचे मार्गदर्शना प्रमाणे वन क्लिक वर ट्रॉफीक समस्या ट्रॉफीक ऑफीसला करता येईल अशी योजना सुरु केली आहे, डिजिटलायझेशनचा वापर करुन वरील समस्या संदर्भात नागरिकांनी त्या समस्येचा फोटो किया काय समस्या आहे ते ट्रॉफीक व्हॉट्सअप मोबाईल क्र. 9552509820 या क्रमांकावर पाठवायची आहे. सदरच्या समस्या प्राप्त होताच ते कार्यालयातून लागलीच पेट्रोलींग वर असलेले रायडर यांच्याकडे पाठविली जाईल आणि रायडर त्या ठिकाणी तात्काळ पोहोचुन कारवाही करतील. ज्या समस्या मोठ्या आहेत किंवा इतर डिपार्टमेंटची संबंधित आहे त्याबाबत पत्रव्यवहार करून नियोजन करून दूर केल्या जातील. रोजच्या दगदगीच्या जीवनामध्ये सामान्य माणूस घरुन निघाल्यानंतर वेळेत आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचावा आणि संध्याकाळी लवकर आपल्या घरी/ कुटुंबात पोहचावा व इतर समस्या दूर करता याव्या यासाठी नांदेड ट्रॉफीक पोलीसांनी सदरची मोहीम हाती घेतली आहे. मा.श्रीकांत वाकोडे, पोलीस अंमलदार, सोशल मीडियाचे चीफ, ट्रॉफीक शाखा वजिराबाद, नांदेड. मो. नं.9552509820,
मा.ओमकांत चिंचोलकर- पोलीस निरीक्षक शाखा भाग-1 नांदेड. यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.