प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने रचला इतिहास ; पश्चिम महाराष्ट्रात करून दाखवलं!

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: क्षणाक्षणाला वाढती उत्कंटा,एकमेकांना आधार देत एकावर एक रचले जाणारे थर,आणि दहीहंडीकडे लागलेले हजारो उपस्थितांचे डोळे* आणि आठव्या थरावर उभ राहून पहिल्याच प्रयत्नात तासगावच्या बालगोविंदाणे दिलेली सलामी हा एक नवा विक्रम तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने रचला आणि पश्चिम महाराष्ट्रात आठ थर लावण्याचा पहिला मान मिळवला,
आणि तरुणाईने खचाखच भरलेल्या मैदानावर *जिद्द,चिकाटी आणि एकीच्या बळावर शिवनेरीच्या पठ्ठ्यांनी करून दाखवलं* म्हणत एकच जल्लोष केला.
यावेळी गोविंदा पथकाने आठ थर लावून यशस्वी कामगिरी केल्याने शिवनेरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि ढवळवेस मधील नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.तासगाव ढवळवेस येथील तरुणांनी एकत्र येऊन 2000 साली स्थापन केलेल्या शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने 23 वर्षात 100 पेक्षा जास्त दहीहंड्या फोडल्या आहेत.दरवर्षी मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.परंतु मंडळाची खरी ओळख हि दहीहंडीच्या माध्यमातून झाली आहे.गोकुळ अष्टमीच्या आधी किमान एक महिना मंडळाचे कार्यकर्ते दहीहंडी फोडण्याचा सराव सुरु करतात.यावर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आठ थर लावायचेच असा चंग बांधूनच सराव सुरु केला होता,आणि त्यात त्यांना यश देखील आल्याने तासगावचं नाव पश्चिम महाराष्ट्रात गाजले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.