प्रतिष्ठा न्यूज

तासगावात डॉ.जिचकर यांच्या जयंतीनिमित्त walk मॅरेथॉनचें आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : डॉ.श्रीकांत जिचकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी प्रेरीत केलेल्या अनेक शहरांमध्ये एकाच वेळी होणाऱ्या *Walk मॅरेथॉन* चें तासगाव येथे आज आयोजन करण्यात आले होते.या मॅरेथॉनमध्ये जवळपास ७० जणांनी भाग घेतला होता.यामध्ये प्रामुख्याने जवळपास ४० ते ४५ महिलांचा सहभाग होता.सकाळी ६:१५ वाजता गणरायाला वंदन करून गणपती मंदिर ते शासकीय महिला तंत्रनिकेतन व परत असा अंदाजे ५.५० कि.मी. अंतराचा टप्पा सर्वांनी पार केला.यावेळी स्वागत आणि उद्घाटन समारंभ आटोपून ६:३० ला गणपती मंदिर पासून मॅरेथॉन वाॅकला सुरुवात झाली. जवळपास एक तासात सर्वांनी हें अंतर कापून सर्वजण परत गणपती मंदिर येथे पोहोचले.अतिशय आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा उपक्रम पार पडला.यावेळी डॉ.प्रसाद देशपांडे,डॉ.किरणसिंह परदेशी,डॉ. जे.बी.पाटील,जेष्ठ नागरिक श्री. आर.आर.यादव साहेब,श्री.चिपाडे वकील,श्री.माधव हुंबे,श्री.विजय पाटील (पोलीस),श्री.महेश शेटे,श्री. रविंद्र कदम सर,श्री.अशोक पवार सर, श्री.योगेश कुलकर्णी,श्री.प्रविण माळी, श्री.स्वप्निल दवंडे,सौ किरण हंचनालकर,सौ अर्चना कुलकर्णी तसेच महिला वर्ग उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.