प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तालुक्यात आत्मा योजनेत गैरकारभार…अमोल काळे मनसेची तक्रार,कारवाईची मागणी..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तालुक्यात आत्मा योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि गैर कारभार झालेचा दिसून येत असून,तालुक्यातील सुमारे ९० टक्के बचत गट विना संमती पत्राचे आहेत. तालुक्यातील बरेच गटातील शेतकन्यांना या योजनेचा लाभ सुदधा मिळालेला नाही.तालुक्यातील अनेक शेतकरी बचत गटात पूर्णपणे तारीख, साक्षीदारांच्या सहया,करारपत्र, कंपनीचे नाव तर कुठे तारखेत करण्यात आलेली खाडाखोड असे अनेक गैर प्रकार या योजने अंतर्गत केलेले दिसून येत आहे.याची चौकशी करून कारवाई व्हावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले आहे की शेतकरी गट नोंदणीचे मस्टर,गटात सहभागी सदस्यांची संख्या,गट नोंदणी प्रस्ताव प्राप्तीचा दिनांक,गट प्रमुखाचे नाव व मोबाईल नंबर,गट नोंदणीसाठी प्रस्ताव,कृषि कार्यालयास पाठवल्याचे पत्र क्रमांकाच दिनांक नाही,तसेच गटाचे प्रमाणपत्र प्रस्ताव मिळाल्याची गट प्रमुख व गट प्रतिनिधी यांच्याही सहया नाहीत.वरील सर्व माहिती,माहिती अधिकार द्वारे प्राप्त झालेली आहे.हा सर्व प्रकार गंभीर स्वरूपाचा असून यासाठी कारणीभूत अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई व्हावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन येईल व त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार राहील,असा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.