प्रतिष्ठा न्यूज

स्वर्गीय रघुनाथराव (नाना) जाधव यांच्या पाेस्ट तिकीटाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

प्रतिष्ठा न्युज/ सुखदेव रावळकर
जालना : अखिल भारतीय हिंदु खाटीक समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष (३१३७५) तथा नाशिक नगरीचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय रघुनाथराव (नाना) जाधव यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारच्या पाेस्ट विभागाने त्यांचे पाेस्ट तिकीट प्रकाशित केले. या तिकीटाचे अनावरण त्यांच्या ९८ व्या जयंती निमित्त देशाचे माजी संरक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी कांग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वर्गीय रघुनाथराव जाधव यांनी त्यांच्या उपनगराध्यक्षपदाच्या काळात अलाैकिक काम केले. अखिल भारतीय हिंदु खाटीक समाज संघटनेच्या माध्यमातून त्यांनी फारशा सुविधा उपलब्ध नसतानाही देशव्यापी दाैरे करून समाजाला एकत्रित करण्याचे काम केले. त्यांच्या या कार्यामुळेच देशभरात विखुरलेला समाज एकत्र अाला अाहे. सामाजिक कार्याची अावड असलेल्या नानांच्या कार्याची दखल घेत पाेस्ट विभागाने त्यांचे छायाचित्र असलेल्या पाेस्ट तिकीटाचे प्रकाशन केले अाहे. देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते नाशिकमध्ये त्यांच्या तिकिटाचे रविवारी (दि.९) अनावरण करण्यात अाले. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी अामदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, दिलीप खैरे,रंजन ठाकरे, रवींद्र पगार, काेंडाजीमामा अाव्हाड, रघुनाथराव जाधव यांचे पुत्र रमेश जाधव, विनायक जाधव, सनी जाधव, सचिन जाधव, व्यंकटेश जाधव अादी उपस्थित हाेते.
अखिल भारतीय हिंदु खाटीक समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष (31375) तथा नाशिक नगरीचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय (नाना) जाधव याचे पोस्ट तिकीट अनावरण झाल्याबद्दल जालना जिल्हा मधुन कांतराव रांजनकर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष कैलासराव कल्याणकर जिल्हा उपाध्यक्ष गजानन रावळकर ऊत्तम रावळकर जिल्हा कोषाध्यक्ष सुखदेव रावळकर राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल खिरडकर तसेच अमोल कल्याणकर आणि आखील भारतीय हिंदु खाटीक समाजाचे सर्व पदाधिकारी याच्याकडुन अभिनंदन होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.