प्रतिष्ठा न्यूज

जोमेगाव येथील पाझर तलाव दुरुस्तीची मागणी

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील जोमेगाव येथे लघु पाटबांधारे विभाग व जिल्हा परिषद नांदेड यांच्या कडुन गेल्या 30 वर्षापूर्वी पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली.  मात्र त्यानंतर आजतागायत एकदाही त्या तलावाची दुरुस्ती व सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे तलावात मोठया प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. तसेच साफसफाई केली नसल्याने तलाव पाळूवर व तलावात बाभूळ, सुबाभूळ, बेशरम,व इतर गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पाळूवरील झाडांमुळे भिंतीला तडे जाऊन भेगा पडल्याचे दिसत आहे.जेंव्हा या तलावाची निर्मिती झाली तेंव्हा पासून पाळू पिचिंगचे कामे अर्धवट अवस्थेत राहिल्याने नेहमी करीता पाणी गळती सुरू असते. बाजूस शेतकऱ्यांची शेती व आखाडे आहेत. यामुळे शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. त्यासाठी तलावाच्या दुरूस्तीसह, तलावातील गाळ काढण्याच्या मागणीचे लेखी निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीने मा. जिल्हाधिकारी नांदेड यांना दि.10 एप्रिल 2023 रोजी सरपंच- गंगाबाई शिंदे व जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस भास्कर पाटील शिंदे यांनी निवेदन दिले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.