प्रतिष्ठा न्यूज

अबॅकस नॅशनल लेवल स्पर्धेत बेडगची आर्या निलेश घोरपडे चॅम्पीयन

प्रतिष्ठा न्यूज

सांगली प्रतिनिधी : अबॅकस नॅशनल लेवल स्पर्धेत बेडगची आर्या निलेश घोरपडे चॅम्पीयन स्पार्टन अबॅकस आणि आर्य अबॅकस आयोजित नॅशनल लेवलची ऑनलाइन स्पर्धा आयोजित केली होती.  सदर स्पर्धेमध्ये देशभरातुन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.  यामध्ये पियुष क्लासेस अँड आर्य अबॅकस, बेडग या शाखेच्या मुलांनी भाग घेतला होता.  यामध्ये 3 -या लेवलमध्ये आर्या निलेश घोरपडे हिने 4.21 मिनीटात 100 गणीतांची सर्व उत्तरे बरोबर दिली व चॅम्पीयन बनुन स्मार्ट वॉच बक्षीसास पात्र ठरली.  तसेच 2 -या लेवलमध्ये मानसी दत्तात्रय पाटील व ज्युनिअर ग्रुप बी मध्ये असद शहनवाज मुल्ला हे दोघे प्रथम पारितोषीक मिळवुन शिल्ड, मेडल व प्रमाणपत्र या बक्षीसास पात्र ठरले. तसेच या स्पर्धेमध्ये ज्युनिअर ग्रुप बी साठी पार्थ अमोल शेट्टी या मुलांनेही सहभाग घेतला होता.  या मुलांना बेडग शाखेच्या वैष्णवी मॅडम ऐश्वर्या मॅडम व रंजना सुर्यवंशी मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले.  प्राथमिक स्वरूपात यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.

 

यावेळी स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे बेडग शाखेच्या मॅडम सौ. रंजना सूर्यवंशी यांनी मनापासून अभिनंदन केले व जास्तीत जास्त मुलांनी या कोर्स मध्ये सहभाग घ्यावा या कोर्समुळे मुलांच्या एकाग्रतेमध्ये वाढ होते, आत्मविश्वास वाढतो, अभ्यासातील गती व अचूकता वाढते, सकारात्मक दृष्टिकोन वाढतो, शैक्षणिक प्रगती होते व मुलांच्या बौध्दीक गुणांना वाव मिळतो.  अशा स्पर्धेमध्ये मुलांनी भाग घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे मत त्यांनी मांडले.  सदर मुलांचे पालकांकडुन कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.