प्रतिष्ठा न्यूज

सावित्री जिजाऊ दशरात्रउत्सवा निमित्त जायंट्स गृपच्या मुकबधिर मुलांच्या शाळेला जिजाऊ ब्रिगेडने भेट

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सावित्री जिजाऊ दशरात्रउत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज दिनांक 4 जानेवारीला जायंट्स गृपच्या मुकबधिर मुलांच्या शाळेला जिजाऊ ब्रिगेड ने भेट दिली. तेथे मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका इनामदार मॅडम यांनी स्वागत केले. शाळेच्या संचालिका डॉ. गाझी मॅडम व भारती चोपडे यांनी शाळेविषयी माहिती दिली. मुकबधिर मुलांमधील कलागुण बघुन महिला थक्क झाल्या. मुकबधिरतेवर मात करीत ही मुले इतर सर्वसामान्य मुलांसारखं शिक्षण घेतात. महिलांनी मुलांचे कौतुक केले.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा प्रणिता पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मुलांना सहानुभुतिपेक्षा इतर मुलांसारखीच वागणुक मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुलांना बक्षीस , प्रशस्ती पत्रक, पौष्टिक खाऊ वाटण्यात आला. अॅड. शोभा पवार व जयश्री घोरपडे यांनी उपक्रमाचे नियोजन केले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सुप्रिया घारगे, सुजाता भगत, अनिता माने, शुभदा जगदाळे उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.