प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिका क्षेत्रातील मालमत्ता सर्व्हेसाठी दोन एजन्सीकडून सादरीकरण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता सर्व्हेक्षण करण्यासाठी अमरावती मधील दोन खासगी एजन्सीनी आपले सादरीकरण केले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार , स्थायी सभापती धीरज सुर्यवंशी यांच्यासह सर्व गटनेते यांच्या उपस्थितीत हे सादरीकरण करण्यात आले.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात 2004 नंतर मालमत्ता सर्व्हे झाला नाही. त्यामूळे अनेक मालमत्ताची नोंद मनपाकडे नसल्याने अशा मालमत्तांना घरपट्टी नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मनपाक्षेत्रातील अशा मालमत्तांच्या शोध घेण्याबाबत आयुक्त सुनील पवार यांनी घरपट्टी विभागाला तशा सूचनाही दिल्या आहे. मनपक्षेत्रातील अशा मालमत्तेचा सर्व्हे करण्याबाबत महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी अमरावती येथील कोअर प्रोजेक्ट आणि एबिएस या दोन खासगी एजन्सीकडून आज सर्व्हेबाबत सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मालमत्तांचां सर्व्हे कसा असेल याबाबत दोन्हीही एजन्सीकडून सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मालमत्ता सर्व्हे करून वसुलीची तयारीही एका एजन्सीकडून दर्शवण्यात आली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार , स्थायी सभापती धीरज सुर्यवंशी, सभागृह नेत्या भारती दिगडे, उपायुक्त राहुल रोकडे , विरोधीपक्ष नेते संजय मेंढे, जगन्नाथ ठोकळे, सूबराव मद्रासी , करनिर्धारक संकलक नितीन शिंदे आणि अधीक्षक वाहिद मुल्ला यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते. या दोन्हीही एजन्सीकडून सादरीकरण झाल्यानंतर कोणत्या एजन्सीकडून कामगिरी करायची याबाबतचा निर्णय मनपा प्रशासन आणि पदाधिकारी हे घेणार आहेत. मालमत्ता सर्व्हे साठी एजन्सी नेमली तर ज्या मालमत्ता घरपट्टी विना आहेत किंवा जुन्या घरांच्या वाढीव बांधकामांची नोंद नाही अशा अनेक मालमत्ता समोर येण्यास मदत होणार आहेत.
दरम्यान जुन्या बांधकामावर नवीन बांधकाम
करण्यात आली असतील आणि त्याची घरपट्टी नोंद नसेल तर अशा मालमत्ता शोधून घरपट्टी लागू करण्याचे आदेश आयुक्त सुनील पवार यानी प्रशासनाला दिले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.