प्रतिष्ठा न्यूज

नि-क्षय मित्रांनी घेतले क्षय रुग्णांना दत्तक; सहा महिन्यापर्यंत उचलणार पोषण आहाराचा खर्च : डॉ. मंजूषा दोरकर यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज
मिरज, ता. 4: राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत वर्ष २०२५ पर्यंत ‘क्षयरोगमुक्त भारत’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या अनुषंगाने आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 47 क्षयरुग्णांना पोषण किटचे वितरण करण्यात येत असून, याकरिता 15 निक्षय मित्रांची नोंदणी झाली आहे.
इनरव्हील क्लब ऑफ मिरज या क्लबने देखील निक्षय मित्र म्हणून नोंदणी केली असून, ‘त्यांनी 20 रुग्णांचे पालकत्व स्वीकारले आहे. रुग्णांना सहा महिन्यापर्यंत मोफत पोषक आहार देण्यात येणार आहे. सदर या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक सार्वजनिक स्तरातून होत आहे. आतापर्यंत 15 निक्षय मित्रांची नोंदणी झालेली आहे . त्यापैकी 7 महानगरपालिका येथील अधिकारी व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. ‘क्षयरोगमुक्त भारत’ उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी टीबी रुग्णांना दत्तक घेऊन पोषण आहार, व्यावसायिक समर्थन, निदानात्मक साहाय्याद्वारे मदत देण्याचे आवाहन केले जात आहे. अन्य व्यक्तींनाही क्षयरुग्णांना स्वच्छेने काही मदत करावयाची असेल तर सहभाग नोंदवावा असे आवाहन आयुक्त श्री. सुनिल पवार व वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनिल आंबोळे आणि डॉ. मंजुषा दोरकर यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.