प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतलेल्या राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेचा निकाल घोषित – अवधूत यरगोळे यांचा प्रथम क्रमांक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सोशल मिडिया मधून अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार तरुणांमध्ये पोहोचावा या हेतूने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या जन्मदिनानिमित्त राज्यस्तरीय रिल्स स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदा या स्पर्धेचे दुसरे वर्ष होते. यंदाच्या स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला आहे. यात डोंबिवली येथील अवधूत यरगोळे यांचा पहिला क्रमांक आला आहे. दुसरा क्रमांक गौरव संभूस (डोंबिवली) व तिसरा क्रमांक कार्तिक हजारे (डोंबिवली) यांचा आला आहे. प्रथम क्रमांकासाठी ₹३०००, पुस्तके व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी ₹२०००, पुस्तके व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी ₹१०००, पुस्तके व प्रमाणपत्र अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत. याशिवाय चांगले व्हिडीओ बनवलेल्या आणखी सात स्पर्धकांना पुस्तके बक्षीस देण्यात येणार आहेत. त्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे- बाईमाणूस मीडिया हाऊस (औरंगाबाद), अनघा श्रीगडीवार, सयाजी थोरात (करमाळा), तुषार वाघ (नेवासा) सूरज कृष्णा भोसले (पुणे), अमित निंबाळकर (सुधागड), सुहास गायकवाड (करमाळा)

या स्पर्धेचे आयोजन म.अंनिसच्या सोशल मिडिया विभागामार्फत करण्यात आले होते. स्पर्धेतील बक्षीसपात्र रिल्स अंनिस संघटनेच्या फेसबुक पेज, युट्युब चॅनेल व इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. स्पर्धेचे परीक्षक म्हणून वाघेश साळुंखे, राहुल माने, अक्षिता पाटील आणि सौरभ बागडे यांनी काम पाहिले.

सर्व स्पर्धकाचे अभिनंदन अंनिसच्य राज्य कार्यकारणी सदस्य मुक्ता दाभोळकर, राहुल थोरात, नंदिनी जाधव, प्रशांत पोतदार, मिलिंद देशमुख, अण्णा कडलास्कर यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.