प्रतिष्ठा न्यूज

भारतीय संविधान दिन आणि शहीद दिनानिमित्त विश्रामबाग सांगली येथील वृंदावन व्हिलाज सोसायटी मध्ये रक्तदान शिबीर संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली :- दिनांक 26 नोव्हेंबर रोजी विश्रामबाग सांगली येथे, भारतीय संविधान दिन आणि शहिद दिनानिमित्त वृंदावन व्हिलाज सहकारी गृहसमूह योजना संस्था विश्रामबाग सांगली येथे श्री वसंतदादा पाटील रक्तसेंटर मिरज यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर पार पडले.

सदर रक्तदान शिबिराचे उदघाटक व प्रमुख अतिथी म्हणुन मा ऍड अमित शिंदे (कायदे तज्ञ्) व मा आरिफ मुल्ला हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक भारतीय संविधान प्रास्ताविक वाचून केली. त्यानंतर पाहुन्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोसायटी अध्यक्ष मा बाळासाहेब पाटील यांनी केले.यानंतर मा अतिथीच्या हस्ते रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. मा अतिथी यांनी रक्तदानचे महत्व या विषयावर माहिती सांगितली की वर्षातून एका व्यक्तीला 4 वेळा रक्तदान करता येते. रक्तदान केल्याने कोणताही अशक्तपणा येत नाही. आणि रक्तदान हे एक राष्ट्रीय कार्य आहे. आज शहीद दिनानिमित्त आणि भारतीय संविधान दिनानिमित्त आपण हे रक्तदान शिबीर आयोजित केले याला खरंच खूप महत्व आहे. आपण जास्तीत जास्त संख्येने आज रक्तदान करूया अशी माहिती दिली.

सदर कार्यक्रमांस सोसायटीचे सर्व कार्यकारिणी सदस्य आणि रक्तदाते व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यानंतर संयोजकांना ब्लड सेंटर मार्फत शिल्ड आणि प्रमाणपत्र अतिथीच्या हस्ते देण्यात आले.बहुसंख्य लोकांनी यावेळी रक्तदान केले.उपस्थित सर्व रक्तदात्यांना संयोजककडून अल्पोपहार देण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे नियोजन सोसायटी अध्यक्ष मा बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटी संचालिका मा मनीषा वाघंबरे तसेच मा पद्मजा माने (जिल्हा कार्यकारिणी सदस्यां, दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन सांगली जिल्हा) तसेच श्री वसंतदादा पाटील ब्लड सेंटर मिरजचे जनसंपर्क अधिकारी मा युवराज मगदूम व इतर कार्यकारिणी सदस्य यांनी मिळून केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.