प्रतिष्ठा न्यूज

विभागीय कुस्ती स्पर्धेत राजर्षी शाहू विद्यालय मुदखेड चे सुयश

प्रतिष्ठा न्यूज/ जिल्हा प्रतिनिधी
नांदेड दि.4 : लातूर येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये मुदखेड येथील राजर्षी शाहू विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे ७२ किलो वजन गटामध्ये १९ वर्षा खालील ताटे गायत्री शिवाजीराव तर 17 वर्षाखालील वयोगटात गोणारे वंदना सुभाष प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच 60 किलो वजन गटात लक्ष्मण शिवाजीराव पुयड या विद्यार्थ्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. वरील प्रथम विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माझी शिक्षण विस्तार अधिकारी श्री प्रल्हादराव सरसे पाटील संस्थेचे मुख्य कार्य अधिकारी डॉक्टर एस. एम. साखरे, प्राचार्य अजय सरसे प्राथमिक मुख्याध्यापक सौ.पवळे क्रीडा शिक्षक बुद्धेवाड क्रीडा मार्गदर्शक पुयड व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा
सत्कार केला व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.