प्रतिष्ठा न्यूज

बीजारोपण ते वृक्षा रोपण, संकल्प ५० हजार रोपे लावण्याचा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आपासाहेब बिरनाळे पब्लिक स्कुल ,शिंदे मळा ,परिसर सांगली येथे *बीजारोपण ते वृक्षा रोपण* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आयुक्त श्री सुनील पवार यांनी मुलाशी संवाद साधताना मूळ संकल्पना  समजावून सांगितली या उपक्रमाचा   उद्देश काय आहे हे पटवून  दिला आहे, मुलांनी या उपक्रमाने  सक्रिय सहभाग नोंदविणे  आवश्यक होते, त्या साठी आज *बीजारोपण ते वृक्षा रोपण*  हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

उप आयुक्त स्मृती पाटील यांनी देखील मुलाशी संवाद साधला आणि मुलाचा  सहभाग किती  महत्वाचा आहे   हे समजून सांगितले आहे.

या वेळी मनपा ब्रँड  अँबेसिडर श्री सुधीर गोरे यांनी सर्व संकल्पना मुलाशी संवाद साधून कृती व्दारे मुलाना सहभागी करून दाखवून दिली आहे.
या वेळी उप आयुक्त श्री राहुल रोकडे , श्री .वैभव साबळे  उपस्थीत होते , डॉ ताटे , अनिल पाटील , अतुल आठवले  स्वछता निरीक्षक  , पर्यावरण अभियंता श्री गुजराती , किल्लेदार ,जन संपर्क अधिकारी श्री धनंजय हर्षद , उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन श्री समीर बिरनाळे , सागर बिरनाळे यांनी सर्वाचा स्वागत करून या उपक्रम बदल  सत्कार केला आहे.

साधारपणे 50 हजार रोपे करण्याचा प्रयन्त चालू भविष्य मध्ये संकल्प करण्यात आला आहे, मनपाने सर्व तयारी केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.