प्रतिष्ठा न्यूज

मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी उमरा सर्कल मधील 24 गावातील नागरिकांचे साखळी उपोषण

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा :- सरसकट मराठा समाजाला ओबीसीत समावेश करावा या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी लोहा तालुक्यातील उमरा सर्कल मधील 24 गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावे, यासाठी मराठा योद्धा- मनोज पाटील जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने उमरा सर्कल मधील 24 गावच्या नागरिकांनी मारतळा येथे दि.28 ऑक्टोबर 2023 पासून सकाळी 11 वाजता अनिश्चित काळासाठी साखळी उपोषण प्रारंभ करून लढा सुरू करण्यात आला आहे. तसेच दररोज एक गाव याप्रमाणे उपोषणास सुरुवात झाली आहे.
राज्य शासनाच्या वेळ काढू पणामुळे आता मराठा आरक्षणाची धक दिवसेंदिवस वाढत असून गावागावात उपोषणे सुरू आहेत उपोषणकर्ते- मनोज  पाटील यांना पाठिंबा देत परिसरातील 50 गावात मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय पुढार्‍यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार टाकला जाणार असे ठराव घेत गावागावात येणाऱ्या मतामतदानावर बहिष्कार टाकला जाणार आहे तसेच गावागावात प्रवेश बंदीचे फलक लावून नेते व पुढार्‍यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर उमरा सर्कलच्या वतीने मारतळा येथे महामार्ग मार्केट यार्डत सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने परिसरातील 24 गावातील गावकऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून आज त्याचा तिसरा दिवस आहे. कामळज येथील ग्रामस्थांनी यात सहभाग घेत उपोषणास बसले आहेत.
यात उमरा, कापशी बु, मारतळा, कौडगाव, कामळज, जोमेगाव, चिंचोली, नांदगाव, हातनी, येळी डोनवाडा, वाका, कापशी (खु) वाळकी (खु) वाळकी (बु) पिंपळदरी, डोलारा, हिंदोळा, करमाळा, गोळेगाव, शंभरगाव, धनंज (बु), धनंज (खु),सुगाव. आदी गावांचा समावेश आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.