प्रतिष्ठा न्यूज

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे घवघवीत यश

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुलींच्या गटात केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, मिरजच्या (सीबीएसई) मुलींचे नेत्रदीपक यश.

दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा क्रीडा परिषद मार्फत आयोजित करण्यात आलेल्या सा मि कु महानगरपालिका क्षेत्रातील स्पर्धेमध्ये अनेक शाळांनी 14 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल गटामध्ये सहभाग घेतला होता.यामध्ये केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल, मिरजच्या (सीबीएसई) मुलीनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. सातारा येथे होणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी या मुलींची निवड करण्यात आलेली आहे.

मुलींना संस्थेचे चेअरमन मा. पृथ्वीराज पाटील, विश्वस्त विरेंद्रसिह पाटील, संस्थेचे समन्वय सतीश पाटील यांनी पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या अधीक्षिका सौ.ख्रिस्टीना मार्टिन, शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ.पदमा सासनूर व समन्वयिका अश्विनी येलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
खेळाच्या सरावासाठी शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रशेखर कांबळे, अतुल जाधव व राजेश कुरणे यांनी मुलीकडून विशेष सराव करून घेतला.

मुलींच्या आंतर विभागीय निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.