प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर काॅलेजचा विद्यार्थी संचित नेव्हल जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनातून जिल्ह्यातून पटकाविला प्रथम क्रमांक: जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कोकाटे यांचे हस्ते सत्कार

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार 
 नांदेड : शहरातील   राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ,वसंतनगर ,नांदेड,   येथील इयत्ता दहावी (क) या वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी संचित शंकरराव नेव्हल यांनी नांदेड जिल्हा स्तरीय विज्ञान स्पर्धेत मोठया  गटातून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.  डॉ. नारायणराव भालेराव हायस्कूल ,स्नेह नगर नांदेड येथे नुकतेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
       या विज्ञान प्रदर्शनात मोठ्या गटातून 40 तर लहान गटातून 40 असे एकूण 80 शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विज्ञान स्पर्धेत मोठ्या गटातून राजर्षी शाहू विद्यालयाचा विद्यार्थी    संचित शंकरराव नेव्हल इयत्ता दहावी क या वर्गात शिकत असलेला  विद्यार्थी यांनी स्मार्ट होम   विज्ञान प्रात्यक्षिक मांडले सादर केले. त्याच्या या मॉडेलला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते संचीत नेव्हल याचा प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
      यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे भाजपाचे चैतन्य देशमुख, शिक्षक श्री बालाजी गर्जे, वसंत दिग्रसकर आदी जण उपस्थित होते.
 संचित शंकरराव नेवल विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक  पटकावल्याबद्दल त्यांचा शाळेचे मुख्याध्यापक श्री बी. एम .हंगरगे, उप मुख्याध्यापक डॉक्टर पांडुरंग  यमलवाड, पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थी संचित नेव्हल  यांस  विज्ञान शिक्षक श्री आनंद मोरे ,शिवानंद टापरे, श्री रत्नाकर कोत्तापल्ले, श्री बालाजी गर्जे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
 जिल्हाभरातून विज्ञान    बाल शास्त्रज्ञ   संचित नेव्हल याचे कौतुक करण्यात येत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.