प्रतिष्ठा न्यूज

परशुरामच्या’ विद्यार्थ्यांची ग्रामपंचायत कार्यालयाला क्षेत्रभेट

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.१२ : येथील परशुराम विद्यालयातील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट संपन्न झाली. या अंतर्गत विद्यार्थी व शिक्षक यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती मिळवली. सर्वप्रथम गगनबावडा ग्रामपंचायतचे सरपंच मानसी कांबळे,,उपसरपंच मुस्ताक वडगावे, सदस्य वृंदापाध्ये व अरुणा पोतदार, ग्रामसेवक दिलीप डवरी यांनी ग्रामपंचायत ची रचना, कार्य, विविध समित्या व त्यांचे कामकाज, शासनाच्या योजना, कर आकारणी याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. व विद्यार्थ्यांचे शंका समाधानही केले.
ग्रामपंचायत म्हणजे पंचायत राज व्यवस्थेचा पाया व लोकशाहीचा आत्मा आहे. म्हणून विद्यार्थी हेच उद्याच्या उज्वल भारताचे नागरिक असलेने  प्राचार्य रंगराव गोसावी, दिगंबर गिरी बुवा यांनी क्षेत्रभेटीचे  आयोजन केले होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.