प्रतिष्ठा न्यूज

एन.आय.आय.टी.फाऊंडेशन ,दिल्ली यांचेकडून राजर्षी शाहू विद्यालयास टी. व्ही.प्रींटर,क्रोम बुक भेट

प्रतिष्ठा न्यूज /राजू पवार
नांदेड : शहरातील राजर्षी शाहू विद्यालय वसंतनगर येथील विद्यालयास एन. आय.आय.टी.फाऊंडेशन आणि डी.आर.टी.ई. यांच्यामार्फत शाळेत टीव्ही संच, प्रिंटर आणि क्रोम बुक या वस्तू भेट देण्यात आल्या. आयआयटी फाउंडेशनचे श्रीमती हिना मॅडम, श्री संदीप बेळे सर ,श्री गोरे सर यांचा शाळेचे मुख्याध्यापक श्री बी. एम. हंगरगे आणि ज्युनिअर चे प्रा.एस.एस.तिवडे यांनी सत्कार केला.
तसेच शाळेच्या सहशिक्षीका श्रीमती एन .एस. खुळे यांनी प्रमुख पाहुण्या श्रीमती हिना मॅडम ( दिल्ली) यांचा पुष्पहार देऊन सन्मान केला.
यावेळी बोलताना हिना मॅडम म्हणाल्या की, भविष्यामध्ये डिजिटल साक्षरता ,ऑनलाईन शिकवणी महत्त्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकाची आणि डिजिटल शिक्षणाची माहिती शिक्षकांनी उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे. भविष्यात डिजिटल साक्षरतेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आम्ही आपल्या शाळेसह नांदेड जिल्ह्यात 25 शाळेला अंदाजे प्रत्येकी दीड लाख रुपयांचे कॉम्प्युटर क्रोम बुक आणि प्रिंटर लॅपटॉप या वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. डिजिटल साक्षरता हे गरीबातील गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे आणि विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान उपलब्ध करून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी विद्यालयाच्या वतीने एनसीसी विभाग प्रमुख डॉ. माणिक गाडेकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी सह शिक्षक श्री एन.पी.केंद्रे,पर्यवेक्षक सावंत,श्री आनंद मोरे,श्री टी.एन.रामनबैनवाड, प्रा.सुभाषराव तिवडे,श्री आर.एच.कदम,श्री रत्नाकर कोत्तापल्ले,श्री सोनाजी वाडेकर, श्रीमती जायेभाये,श्रीमती जाधव, आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.