प्रतिष्ठा न्यूज

शेतक-यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर आवाज उठवणार -बाळासाहेब रास्ते प्रदेशाध्यक्ष बळीराजा पार्टी : प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सांगलीत विविध संघटनांच्या वतीने सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली येथे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रास्ते यांची बळीराजा पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाले बदल सांगली जिल्ह्यातील विविध पक्ष- संघटनांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी बाळासाहेब रास्ते यांनी बोलताना सांगीतले कि राज्यातील विविध सत्तेतील व इतर राजकीय पक्ष साटेलोटे करून स्वत:ची झोळी भरत आहेत, ते दाखवतात एक आणी करतात एक असं आहे, शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, बळीराजा पार्टी शेतक-यांच्या प्रश्नांवर राज्यभर आवाज उठवेल असं त्यांनी सांगीतले.
सांगलीतील शासकीय विश्रामगृहात काॅम्रेड शंकरराव पुजारी यांचे अध्यक्षतेखाली हा सत्कार कार्यक्रम पार पडला,
श्री बाळासाहेब रास्ते यांचा फुले पगडी व बळीराजाची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला,
प्रास्ताविक श्री शशिकांत डांगे यांनी केले तर स्वागत चंद्रकांत गायकवाड यांनी केले. या प्रसंगी श्री गोविंदराव खटावकर, श्री. अविराजे शिंदे, श्री.तानाजीराजे जाधव, श्री सुनिल गुरव, श्री आनंदराव नालगे पाटील, श्री.शिवाजी त्रिमुखे, श्री.आकाश तिवडे, श्री. प्रभाकर भोरे,श्री.भिमराव बेंगलोरे, श्री.शहाजी हराळे, वीरपत्नी शांता बागडे, यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या,
तर आभार श्री अमोल भोसले यांनी मानले, या प्रसंगी, बाळासाहेब रास्ते यांच्या मातोश्री, श्री.विनायक जाधव,श्री.आप्पा पाटणकर,श्री, मोहन राजमाने,श्री मनोहर रास्ते, श्री.बाबा पाटणे, श्री संजय सदामते, श्री. दादू सदामते, श्री. विठ्ठल रास्ते, डाॅ.सदाशिव कांबळे, श्री तायाप्पा गोडबोले, श्री.गणेश शिंदे, मोझेस हेगडे,श्री.प्रमोद रास्ते, श्री नागनाथ माने, श्री राजेश साळुंखे, श्री.विजय (दादा) सनदी, श्री.शंकर कांबळे, आदी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.