प्रतिष्ठा न्यूज

ठाकरे सरकारने केलेल्या कवलापूर विमानतळ जागेच्या महाघोटाळ्याची चौकशी करून संबंधितांना अटक करा : पृथ्वीराजभैय्या पवार यांची मागणी ; जयंत पाटील यांनी जिल्ह्याला उत्तर द्यावे

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : कवलापूर विमानतळाची जागा कवडीमोल दराने एका कंपनीच्या घशात घाल्याण्यात आली आहे. हा घोटाळा ठाकरे सरकारच्या काळात झाला असून या घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांना अटक करा. तसेच या घोटाळ्याबाबत माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्याला उत्तर द्यावे  अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव पृथ्वीराजभैय्या पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. आम्ही सांगलीकरांचा व कवलापुर च्या पंचक्रोशीतील तमाम भुमीपुत्र व युवकांचं पुढील ७ पिढयांचे भविष्य घडवु शकेल अशी जागा कोणी भ्रष्ट मार्गाने हडप करुन शेकडो कोटी रुपयांनी स्वत:ची घरे भरणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला.
पृथ्वीराज पवार म्हणाले,  कवलापुरची जागा विमानतळासाठी वापरली जाणार नसेल तर  पंचक्रोशीतील भूमिपुत्रांना केंद्स्थानीठेवुन त्याचा विकास शासनानेच केला पाहिजे.  विमानतळाला लागुन असलेल्या गटामधील जागेस ९ लाख रुपये गुंठा असा बाजारभाव सुरु आहे , म्हणजेच अंतर्गत रस्ते, ओपन स्पेस व डेव्हलपमेंट खर्च वजा जाता साधारण ३ कोटी रुपये एकरी जागेच्या विक्रीतून आज रोजी व्यवहार होत आहेत. पण आमच्या माहिती प्रमाणे विमानतळाची जागा एकरी अवघे २८ लाख रुपये  अशा कवडीमोल किमतीला एका कंपनीस देण्यात आली आहे. या भागातील रेडीरेकनर ही कित्येक पटीने जास्त आहे. ठाकरे सरकारच्या काळात सगळा महाराष्ट्र कोरोनाने अत्यंत गंभीर परिस्थितितून जात असतांनाच,  दोन वर्षापूर्वी ही जागा हडप करण्याचे स्पष्ट उद्दीष्ट समोर ठेवुन मुंबई-गुजरात स्थित एका शिपिंग कंपीनीने,, स्पाईसेस (मसाले) व्यवसायीकतेचा कोणताही पुर्व इतिहास नसतांना एक स्पाईस कंपनी स्थापन करण्यात आली. कवलापुर विमान तळापासून अवघे १.५ किमी वरील कुपवाड MIDC मधे आज मितीस २ कोटी रुपयांना ही जागा मिळत नाही, सांगली पासुन ७० किमी दुर वरील शाळगाव MIDC मधे ५० लाख ते १ कोटींचा आसपास दर सुरु आहे.  पण तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाईं यांचे कार्य काळात  सुमारे ५०० कोटी रुपये पेक्षा जास्त किमतीची आपली जागा अवघे ४४-४५ कोटी रुपयांना सदर कंपनीस देण्यात आली. सर्वात गंभीर बाब म्हणजे या जागेचा व्यवहार हा कोणताही जाहिर लिलाव पध्दतीने न करता, फक्त काही मोजके प्रस्ताव घेतले गेले व त्यातील बाकीचे प्रस्ताव डावलून या एकाच कंपनीवर मेहेरबानी करण्यात आली.
उपलब्ध माहिती प्रमाणे सदर कंपनीला स्वत :च्या वापरा साठी फक्त ३० एकर जागेची गरज आहे,  पण उर्वरीत १३० एकर जागा कंपनीच्या नावे  कवडीमोल किंमतीने घेवुन प्लॉटिंग पाडुन ती पुढे कोट्यावधी रुपये किंमतीला विकुन जिल्ह्यातील फकत ४ लोक शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार  करुन स्वत:ची घरे भरणार आहेत. हि कंपनी प्लॉट विक्री पोटी एडवांस घेवुन तेच पैसे शासनास भरण्याच्या तयारीत आहे. त्या मुळे सदर कंपनीने सदर व्यवहारा पोटी पैसे भरण्यास २ वेळा मुदत वाढ घेतली आहे. म्हणजे zero investment मध्ये शेकडो कोटी रुपये खिशात घालण्याची शक्कल लढवली जात आहे. सदर कंपनीला हि जागा मिळावी म्हणुन या व्यवहारा पाठीमागे सांगली जिल्हातील दोन नेते व त्यांचे कळसुत्री बाहुल्या अहोरात्र काम करीत आहेत.. त्या पैकी काही बाहुल्या हे सध्याचा  (वाळवा) इस्लामपुर मतदार संघातील आहेत. धावत्या गाडीतूनही ज्यांना, रस्त्यावर पडलेली सुई ही दिसु शकते अशी नजर असणारे माजी पालकमंत्री जयंत पाटील यांना आम्हा नागरिकांचा सवाल आहे की हया मोक्याच्या सार्वजनिक जागेचा, सांगलीकरांचा व जिल्हयाचे पुढील सात पिढयांचे भविष्य ठरु शकेल अशी हि जागा असे  कवडी मोल किमतीत हडप केले जात असतांना तुम्ही कोठे होता.. ? माजी पालक मंत्री जयंत पाटील यांनी हा सगळा व्यवहार काय आहे हे जनतेत येवुन खुलासा करावा व आमच्या प्रश्ननां ना उत्तर दयावे. माजी महापौर सुरेश पाटील यांच्या पुढाकाराने या बाबत मा. उच्च न्यायालयात एक दावा दाखल आहे असे कळते. राष्ट्रवादी मध्ये असुनही सुरेश पाटील (अण्णा )यांनी विरोध करण्याचे धाडस केले त्या बद्दल त्यांचे कौतुक आहे.. तिथे सेटलमेंट होणार नसेल तर आम्ही त्यांना साथ देवु. पण आमच्या माहिती प्रमाणे सुरेश पाटील अण्णा यांचा प्रस्ताव आहे की १६० एकर जागे पैकी ५० एकर जागा त्यांच्या सोबत असणा-या व्यापा-यांना दिल्यास केस मागे घेवु. म्हणजे तेरी भी चुप मेरी भी चुप मिल बाट के खायेंगे. आणी इथल्या युवकांनी भुमीपुत्रांनी पिढ्यांपिढ़या फक्त हमाली व चाकरीच करायचं काय?? इथले युवक उच्च शिक्षीत आहेत . आम्ही पण स्टार्ट अप ईडीया, मेक इन ईंडीया व स्वकष्टाने उद्योजक होवु इच्छीतो. जयंतराव पाटील यांचे कडुनच  या सगळ्या प्रकरणाचे उत्तर आले पाहीजे. या सगळ्या प्रकरणात काही  बाहुल्या नाचवल्या जात आहेत व यांचे  कर्ते करविते कोण आहेत ? त्यांचे कोणाशी लागेबांधे आहेत यांचे सबळ पुरावे आमच्या कडे आहेत. वेळ आली की ते बाहेर काढुच.  आम्ही सांगलीकरांचा व कवलापुर च्या पंचक्रोशीतील तमाम भुमीपुत्र व युवकांचं पुढील ७ पिढयांचे भविष्य घडवु शकेल अशी जागा कोणी भ्रष्ट मार्गाने हडप करुन शेकडो कोटी रुपयांनी स्वत:ची घरे भरणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही.
पंचक्रोशीतील भुमीपुत्र व नागरीकांना विश्वासात घेतल्या शिवाय सदर कंपनी व सुरेश पाटील यांचा ५० एकर जागेचा  चा प्रस्ताव या  दोन्ही गोष्टीना आमचा विरोध राहील. प्रसंगी रस्त्यावर उतरु व न्यायालयीन लढा उभा करणार आहोत. कंपनीच्या पाठीशी असणा-या लोकांना व प्लॉटचा व्यवहार करु इच्छीतांना आमचा इशारा आहे की प्रसंग पडला तर तुमच्या दारात मोर्चा  घेवुन येवु. पण कोणत्याही प्रसंगात येथे पाय ठेवु देणार नाही. भाजपाचे ज्येष्ठ राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी मकरंद (भाऊ ) देशपांडे यांनी व मी याबाबत एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. असे पृथ्वीराज पवार यांनी सांगितले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.