प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगडच्या ४९ विद्यार्थ्यांची “विप्रो” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपुर प्रतिनिधी : कोर्टी (ता.पंढरपुर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातर्फे कॅम्पस मुलाखत आयोजित करण्यात आली होती. या मुलाखतीतून विविध विभागातील ४९ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
अल्पावधीतच पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने अभियांत्रिकी शैक्षणिक क्षेत्रात दबदबा निर्माण करून विद्यार्थी केंद्रबिंदू मानुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असेलले सिंहगड महाविद्यालय प्लेसमेंट मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे मानवी अधिकार, मुलभुत अधिकार अबाधित राखून पालकांच्या विश्वास पाञ ठरून विद्यार्थ्यांना तणावमुक्त शिक्षण, गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणजे पंढरपूर सिंहगड असा वेगळा नावलौकिक सिंहगड संस्थेचा संपूर्ण जगभर आहे
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कॅम्पस ड्राईव्ह मधुन काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सुभाष मोटे, आरती येमूल, सौरभ वांगीकर, रामेश्वर चौवरे, आरती शेळके, साहिल जोशी, रोहित बागल, रोहित मुंगसे, विशाल फुले, शुभम बाबर, ऋषिकेश कोळे, तेजश्री बोडके, शुभम लहांडे, अथर्व परिचारक, अनुजा मुळे, मैथली महाकोडे, अमृता कुसुमडे, सोनाली काळे, सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील ज्योत्स्ना राऊत, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील अतिक पठाण, श्रेया भाहदुले, मयुरी पाटील, शांता लोखंडे, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील उमा गायकवाड, कौसर मुजावर, अनिकेत ओहाळ, शुभम सुतार, यश पवार, आकाश वाघ, अमिर शेख, सुरज राऊत, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील अजिंक्य कोळवले, अंकित पाठक, अभिजित घोटगे, रोहन देशमुख, ओंमकार परदेशी, अनिरुद्ध जोशी, ॠत्विक बडवे, अमिन शेख, सुर्यकांत सोनटक्के, तेजस जयकर, ओंकारेश्वर आढवळर, तेजस कुलकर्णी, समाधान माळी, योगेश जानकर, श्रीनिवास गोसावी, श्रीनाथ काळे, विजय ढोबळे, ऋषिकेश कांबळे आदी ४९ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन “विप्रो” कंपनीकडून ३.५० लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
“विप्रो” कंपनीत निवड झालेल्या ४९ विद्यार्थ्यांचे काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.