प्रतिष्ठा न्यूज

पेडच्या गीता शिंदे यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : पेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका गीता अतुल शिंदे यांना यावर्षीचा तालुकास्तरीय “आदर्श शिक्षिका “पुरस्कार जाहीर झाला आहे.शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल तासगाव पंचायत समिती यांच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.गीता शिंदे या मागील पंधरा वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.त्यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.शैक्षणिक साहित्य स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन,  लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन वर्ग त्यांनी सुरु केले होते.तसेच शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम त्यांनी राबविला आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्याना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.पुरस्कार जाहीर होताच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.