प्रतिष्ठा न्यूज

शेखर इनामदार यांची सांगली महापालिकेसाठी भाजपच्या ५० प्लसची घोषणा ; वाढदिवसानिमित्त तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, माजी मंत्री विनय कोरे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभा प्रभारी व समन्वयक शेखर इनामदार यांचा वाढदिवसानिमित्त श्रीराम प्रतिष्ठानतर्फे नागरी सत्कार झाला. यावेळी त्यांनी  सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या ५० प्लस मिशनची घोषणा केली. याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शेखर इनामदार यांचा येथील राजमतीनगर क्रीडांगणाजवळ रात्री इनामदार यांचा भव्य नागरी सत्कार झाला. नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, माजी मंत्री विनय कोरे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील, नितीन शिंदे, मकरंद देशपांडे, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पवार, दीपक शिंदे, दिलीप सूर्यवंशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम उपस्थित होते.शेखर इनामदार यांचा वाढदिवसनिमित्त युवा मॅरेथॉन, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, झांजपथक स्पर्धा, फळे वाटप, मोफत शिवभोजन यासह अनेक उपक्रम राबविण्यात आले.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, शेखर इनामदार दिलदार नेते आणि सर्व कायर्कर्त्यांचे मित्र आहेत. त्यांनी इतर पक्षातील दिग्गज नेत्यांना भाजपात आणून पक्ष मजबूत केला. सांगली महापालिकेसह जिल्ह्यात विविध ठिकाणी भाजपला अनेक मोठे विजय मिळवून दिले. इनामदार यांनी स्वतःसाठी कधीही पद मागितले नाही. पक्षाचा विजयी होईल, कार्यकर्ते मोठे होतील यासाठीच त्यांनी कष्ट घेतले.  त्यामुळे त्यांचे नेतृत्व वाढले. ते नेहमी विचारात असतात मी हवा आहे का नाही. तर असा संभ्रम ठेऊ नये. कोण कितीही श्रेष्ठ असला तरी भाजपमध्ये नको असलेल्यांना घरी बसवले जाते. त्यामुळे शेखर इनामदार यांनी आपले मनोबल उंचवावे. राजकीय जीवनात ते यशस्वी झाले आहेत. त्यांची हि यशस्वी घोडदौड अशीच सुरु राहो. माजी मंत्री विनय कोरे म्हणाले, सामान्य कार्यकर्ता ते महापालिका ताब्यात घेणारा जादूगर, ही इनामदार यांची राजकीय जीवनातील झेप कौतुकास्पद आहे. पक्ष कसा वाढविला पाहिजे हे त्यांच्याकडून शिकावे.
शेखर इनामदार सत्काराला उत्तर देताना म्हणाले, गेल्या तेहतीस वर्षाच्या राजकीय प्रवासात पक्षासाठीच काम करत राहिलो. एखादे मोठे पद मिळावे,  आमदार, खासदार व्हावे, असे कधीही वाटले नाही. दिल्ली, मुंबईचा लोभ कधीही झाला नाही. सांगली शहराचा विकास हेच एकमेव ध्येय ठेवून काम करीत आहे. अनेक मोठी राजकीय घराणी भाजपमध्ये आणली आणि ती टिकवून ठेवली आहेत.  लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षाचा विजय झाला. यापुढेही जिल्ह्यात भाजपचाच वरचष्मा राहील. सांगली महापालिकेच्या निवडणुकीत ५० पेक्षा जास्त नगरसेवक भाजपचेच असतील.
खासदार पाटील, पृथ्वीराज देशमुख यांनी इनामदार यांच्या कामाचे कौतुक केले. दीपक माने यांनी स्वागत केले. भारती दिगडे यांनी आभार मानले. स्थायी समितीचे माजी सभापती धीरज सूर्यवंशी, मोहन वनखंडे, विनायक सिंहासने, सुब्राव मद्रासी, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष स्वाती शिंदे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.