प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीत नेताजी सुभाषचंद्र बोस व माजी खासदार ॶॅड. एस. डी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी आणि काँग्रेस सेवादल यांचे वतीने काँग्रेस कमिटी येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आणि सांगलीचे माजी खासदार व जिल्हाध्यक्ष ॶॅड एस.डी.पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वागत प्रास्ताविक काँग्रेस सेवादलाचे मुख्यसंघटक अजित ढोले यांनी केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी अशोक मालवणकर यांनी माहिती दिली. यावेळी डी.पी. बनसोडे,नंदकुमार शेळके,सौ. मालनताई मोहिते प्रदीप डफळे, शिवाजी सावंत, विठ्ठलराव काळे, बाबगोंडा पाटील, सौ सीमा कुलकर्णी, शमशाद नायकवडी, जन्नत नायकवडी,कांचन खंदारे अल्लाबक्ष मुल्ला, श्रीधर बारटक्के,मच्छिंद्र महापुरे, सुभाष पट्टणशेट्टी, राजू भोरे,पोपट पाटील, सचिन पाटील, सुरेश गायकवाड, रवींद्र वळवडे, पंडित पवार, सचिन चव्हाण, भिमराव चौगुले, हानिफ डफेदार,नामदेव पठाडे, विश्वास यादव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.