प्रतिष्ठा न्यूज

2023 चा शिवजन्मोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शिवजन्मोत्सव समिती सांगली यांच्यावतीने 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी काल बैठक संपन्न झाली.
शिवजन्मोत्सव मोठ्या पद्धतीनं साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ढोल ताशा पथक, पोवाडे, व्याख्याने,लेदर शो, फटाक्यांची आतषबाजी, लाडू वाटप, जेवण याचबरोबर विविध संस्था यांच्या वतीने हिरकणी कट्टा, रक्तदान शिबिर, सायकल रॅली अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती घराघरात साजरी करण्याची परंपरा वाढीस लागावी व सर्वांनी त्यांचे विशाल विचार आचरणात आणावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
श यावेळी श्रीरंग पाटील, धनाजी कदम, पंडितराव पाटील, ऋषिकेश पाटील, सतीश साकळकर, डॉ संजय पाटील, रवींद्र केसरे, योगेश पाटील, प्रशांत पवार, युवराज शिंदे, श्रीकांत पाटील, रघुनाथ कबुडगे, प्रशांत भोसले, योगेश सूर्यवंशी, आनंद देसाई, नितीन चव्हाण, प्रवीण नांदवडेकर, उत्तमराव कांबळे, अमोल सूर्यवंशी, सुनील जाधव, राहुल पाटील, प्रमोद पाटील, इत्यादी लोक उपस्थित होते.
स्वागत डॉ संजय पाटील, आभार युवराज शिंदे यांनी मांडले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.