प्रतिष्ठा न्यूज

पाचव्या धम्मविचार साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी संजय आवटे यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि पत्रकार संजय आवटे यांची रविवार दि. 29 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या पाचव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व संमेलनाच्या निमंत्रक ॲड. करुणा विमल यांनी संजय आवटे यांना दिले.
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था तथागत बुद्धांच्या मानवतावादी विचारणा घेऊन काम करणारी महत्त्वपूर्ण अशी संस्था असून या संस्थेच्या वतीने धम्म विचारांचा जागर करण्यासाठी दर वर्षी धम्मविचार साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते.
या वर्षीच्या पाचव्या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षदासाठी संजय आवटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून संजय आवटे लेखक व पत्रकार म्हणून महाराष्ट्रभर सुपरिचित आहेत. आम्ही भारताचे लोक, गेम ऑफ थ्रोन्स, बाराक ओबामा या गाजलेल्या पुस्तकासह दहा हुन अधिक ग्रंथांचे त्यांनी लेखन केले आहे. स्पष्ट, परखड पत्रकार व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक म्हणून त्यांना महाराष्ट्रभर ओळखले जाते. साहित्य व सामाजिक क्षेत्रातील मनाचे व सन्मानाचे 50 हुन अधिक पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. संजय आवटे हे संवेदनशील मनाचे आणि ऐतिहासिक लेखन करणारे साहित्यिक व समीक्षक म्हणून ओळखले जातात.
संजय आवटे हे वास्तववादी लेखन करणारेही लेखक आहेत.
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, आयोजित धम्मविचार साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी संजय आवटे यांची निवड झाल्याबद्दल साहित्य व पत्रकार क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.