प्रतिष्ठा न्यूज

नांदेड येथील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर काॅलेजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा

प्रतिष्ठा न्यूज/राजू पवार
नांदेड : शहरातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर काॅलेज,तसेच कस्तुरबा गांधी
विद्यालय,राजर्षी शाहू बालक मंदिर येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बी.एम.हंगरगे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मु.अ.श्री हंगरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी ” अवयव दान ” ही नाटीका सादर केली.तसेच राष्ट्रभक्तीपर गीत गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी मराठवाडा शिक्षण संस्थेचे संचालक श्री चंद्रशेखर सोनवणे, श्री आनंदराव लाठकर
,डॉ.पी.डी.जाधव,श्रीजी.व्ही.थेटे सर, तसेच प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ, संस्थेच्या मार्गदर्शक डॉ. गायत्री वाडेकर मॅडम आदिजण उपस्थित होते. यावेळी डॉ. गायत्री वाडेकर मॅडम यांचे हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांंचा रोख रक्कम,बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच उप मुख्याध्यापक डॉ.पांडूरंग यमलवाड,पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत, प्रा.डाॅ.तुकाराम जाधव,प्रा.एस.एस. तिवडे, श्री बालाजी कदम,श्री आनंद मोरे,श्री अमोल भंगाळे, श्री टी.एन.रामनबैनवाड,श्री एन.पी.केंद्रे,श्री सुर्यकांत टापरे यांच्या सह सर्व शिक्षक, शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री शिवानंद टापरे यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.