प्रतिष्ठा न्यूज

शंकर विद्यालय रहाटी येथील नागेश बोकारे धावण्याच्या स्पर्धेत नांदेड जिल्ह्यात प्रथम

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड दि. 14 : क्रीडा युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रिडा कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत ‘शंकर विद्यालय राहाटी (बु.)” ता. नांदेड येथील विद्यार्थी नागेश तुकाराम बोकारे याने 800 मीटर धावणे स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम येऊन चमकदार कामगीरी केली आहे. लातूर येथे विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेस पात्र ठरला आहे.

या विजयी विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. पुढील होणाऱ्या स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष मा. केशवराव बोकारे साहेब, संस्थेचे सचिव मा. माणिकराव लांडगे सर, सह सचिव शंकरराव बोकारे साहेब, मुख्याध्यापक तानाजी पवार, मा. मारोतराव मोरे, अशोक चव्हाण, उमेश गज्जेवार, भानूदास मोरे, शिवाजीराव ढगे, राजपाल लांडगे, भिमराव सकनुरे, प्रविण इंगोले, अमोल जीवतोडे, राठोड मॅडम, भुरे मॅडम, पांडूरंग लांडगे, मोहन आलमवाड, क्रिडा शिक्षक बालाजी डोंगळीकर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे. तसेच प्रतिष्ठा न्युज टीम कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.