प्रतिष्ठा न्यूज

“शिवसेनेच्या होऊद्या चर्चा” अभियानास सावळज मध्ये उस्फूर्त प्रतिसाद

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज : सावळज ता.तासगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने “होऊद्या चर्चा” अभियानास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या अभियानातून माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकीर्दीत झालेली विकास कामाची माहिती आणि सध्याच्या राज्य सरकारची व केंद्र सरकारची खोटी आश्वासने वाढती महागाई याचा आढावा असलेली पत्रके पदयात्रा काढत सावळज शहरातील सिध्देश्वर मंदिर परिसर, जयहिंद चौक,तसेच प्रमुख रस्त्यावरील व्यवसायिकांना पोहच करत राज्य सरकारच्या ट्रिपल इंजिन सरकारची व केंद्र सरकारची पोलखोल करण्यात आली या अभियानास सावळज व परिसरातील नागरिकांतून प्रचंड प्रतिसाद मिळाला तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारची वाढती महागाई व नागरिकांना दिलेली खोटी आश्वासने यांच्या विरोधात सावळज मधील नागरिकांनी केंद्र सरकार व राज्य सरकाच्या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी शिवसेनेचे तासगाव तालुका प्रमुख प्रदीप (काका) पाटील, तासगाव शहर प्रमुख विशाल शिंदे, माजी तालुका प्रमुख अनिल शिंदे, उपतालुका प्रमुख संदीप मस्के, गजानन पाटील, सुनील मगदूम, प्रताप निकम, दादासो आवळे, अनिल पाटील, श्रीकांत शिंदे,आदी मान्यवर शिवसैनिक,व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.