प्रतिष्ठा न्यूज

कंधार तालुक्याचे लक्ष लागलेल्या लाडका सेवा सहकारी सोसायटीवर: आमदार- शिंदे गटाचे वर्चस्व

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : कंधार तालुक्यातील लाडका येथील सेवा सहकारी सोसायटीवर आमदार शामसुंदर पाटील शिंदे यांच्या गटाने या निवडणुकीत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीकडे पूर्ण कंधार तालुक्याचे लक्ष होते.
यावेळी विजयी उमेदवारांचे आमदार शामसुंदर पाटील शिंदे व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा- आशाताई शामसुंदर पाटील शिंदे यांनी सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विजयी उमेदवरांच्या व गावकऱ्यांच्या वतीने आ.शिंदे व आशाताई शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन- शिवाजी शेषराव शिंदे, सरपंच-किशन दिगंबर शिंदे, गजानन पंढरी शिंदे, हणमंत पाटील शिंदे, त्र्यंबक व्यंकटराव शिंदे, बाबाराव माधवराव शिंदे, सहदेव बाबा शिंदे, यमुनाबाई संभाजी शिंदे, कांताबाई दिगंबर अरगुडवार, पांडुरंग मारुती शिंदे, आनंदराव शिंदे, काळबा बोच, रामदास काटेमोर, शेषराव सूर्यवंशी, प्रभूसिंग पवार, विलास बोयवारे, सुरेश बोयवारे, शेषेराव शिंदे, गौस इब्राहिम, विठ्ठल डुबुकवाड, उत्तम धोंडगे, बालाजी शिंदे, रामराव शिंदे, विक्रम शिंदे, नागेश शिंदे, ओमकार शिंदे सह भास्कर पाटील जोमेगावकर, माधवराव कदम, व गावकरी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.