प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या चंपाबेन ज्ञानमंदिर शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वयंअध्ययन कार्यशाळा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : अलीकडच्या काळात मोबाईल टीव्ही व सामाजिक माध्यम इत्यादींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची एकाग्रता,लक्षपूर्वक ऐकण्याची प्रवृत्ती कमी झाल्याचे दिसून येते.एका ठिकाणी स्थिर बसून अभ्यास करणे, पाठांतर करणे अशा गोष्टींचा सर्वसामान्यपणे अभाव दिसून येतो. या आणि अशा सर्वच गोष्टींवर मात करता यावी व विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या चांगल्या सवयी लागाव्या या उद्देशाने चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर प्रशालेत दोन दिवसीय स्वयंअध्ययन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री मुकुंद जोग,विज्ञान शिक्षक श्री सुरेंद्र स्वामी,सौ.माधुरी कुलकर्णी,सौ.अर्चना माळी,श्री जोशी सर आदींनी शरीर,मन,बुद्धी,वेळेचे नियोजन,अध्ययनातील अडथळ्यांवर कशी मात करावी,स्वावलंबनाच्या सवयी,वाचन व लेखन कौशल्य वाढविणे,आदी विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने दिली.यावेळी अशा कार्यशाळा निरंतर व्हाव्यात अशी मागणी पालक वर्गातून केली गेली.या स्वयंअध्ययन कार्यशाळेस शिक्षक, विद्यार्थी,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.