तमाशा कलावंत घनःशाम खाडे यांचे निधन
सांगली, ता. ६: लोकनाट्य तमाशा कलावंत घनःशाम रामचंद्र खाडे (वय ८२, कवलापूर, ता. मिरज)
यांचे निधन झाले. रक्षा विसर्जन विधी रविवारी (ता. ७)सकाळी साडे नऊ वाजता कवलापूर येथे आहे.
त्यांच्या पाश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ तमाशा कलावंत दिवंगत विनोद सम्राट काळू बाळू यांचे ते पुतणे होत. काळू बाळू तमाशातील
चौथ्या पिढीतील रंगभूमीवरील पहिले नायक होते. त्यांनी 12 व्या वर्षी तमाशा रंगभूमीवर प्रवेश केला. 60 वर्षे रंगभूमीची सेवा केली.