प्रतिष्ठा न्यूज

सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण अपार्टमेंटच्या जागा सोसायट्यांच्या नांवे करण्याची संधी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 10 (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांचे येत्या १०० दिवसांत डीम्ड कन्व्हेयन्स (मानीव अभिहस्तांतरण) करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने सहकार विभागाला दिले आहे. यामुळे बिल्डरांच्या नावावर असलेल्या अपार्टमेंटच्या जागा सोसायट्यांच्या नावावर करुन घेण्याची संधी फ्लॅट धारकांना मिळणार असल्याची माहित जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे सांगली यांनी दिली.
महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट, १९६३ मधील तरतुदीनुसार अपार्टमेंट बांधलेल्या जागेची मालकी संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या नावावर करुन देणे (डीम्ड कन्व्हेयन्स) बिल्डरांना बंधनकारक आहे. मात्र गृहनिर्माण संस्थांच्या उदासिनतेमुळे डीम्ड कन्व्हेयन्सकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक बिल्डर अपार्टमेंटची जागा सोसायट्यांच्या नावावर करुन देण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे भविष्यात मिळणाऱ्या वाढीव चटई क्षेत्राच्या(FSI) लाभापासून सोसायट्या वंचित राहतात. डीम्ड कन्व्हेयन्सअभावी अपार्टमेंट बांधले तरी त्या जागेवरील मालकी संबंधित बिल्डरचीच राहते.
गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीनंतर पहिल्या सभेत डीम्ड कन्व्हेयन्सचा ठराव मंजूर करुन, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. अभिहस्तांतरणासाठी राज्य सरकारने आठ कागदपत्रांची ‍निश्चित केली आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत वा पूर्वी नोंदणी झालेल्या संस्थांना मानीव अभिहस्तांतरणासाठी अर्ज करता येतील त्यासाठी (१)मोफा कायद्याच्या नियमामधील नमुना ७ मधील अर्ज, (२)सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र/कंपनी नोंदणी प्रमाणपत्र/डिड ऑफ डिक्लरेशन ची प्रत, (३) ले आऊटचा सर्व्हे/गट नं.चा ७/१२ किंवा मिळकत पत्रिकांचा तीन महिन्यांच्या आतील उतारा, (४) सदनिकेच्या विक्री करारनाम्याची प्रत किंवा इंडेक्स २ किंवा सदनिकेच्या मालकी हक्काचा पुरावा जसे वारस प्रमाणपत्र, न्यायालयाचा हुकुमनामा किवा मृत्यूपत्र इ. (५)महाराष्ट्र येश्म अधिनिमय, १९७० अन्वये प्रवर्तकाला बजावलेली कायदेशीर नोटीस, (६)सर्व कायदेशीर सदनिकाधारकांची यादी, (७)बांधकाम पूर्णत्व/आरंभ प्रमाणपत्र, (८)बिनशेती प्रमाणपत्र/आदेश अशा ८ कागदपत्रांसह अर्ज करता येईल.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सहकारी गृहनिर्माण संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.