प्रतिष्ठा न्यूज

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ 10,000 साधकांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात संपन्न !

प्रतिष्ठा न्यूज
फोंडा प्रतिनिधी : ‘सनातन संस्‍थे’चे संस्‍थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा 81 वा जन्‍मोत्‍सव सप्तर्षींच्या आज्ञेने यंदा ‘ब्रह्मोत्‍सव’ म्हणून साजरा करण्यात आला. सनातन संस्थेचे गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतून आलेल्या तब्बल 10,000 हून अधिक साधकांच्या उपस्थितीत अत्यंत भावभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. गोव्यातील फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या मैदानावर या ‘ब्रह्मोत्सवा’चे भव्य आयोजन करण्‍यात आले होते. आंध्रप्रदेशमधील तिरुपतीस्थित श्री बालाजी देवस्‍थानाच्‍या वतीने सुवर्णरथातून श्री तिरुपती बालाजीची जी शोभायात्रा काढण्‍यात येते, तिला ‘ब्रह्मोत्सव’ म्‍हणतात. त्‍याप्रमाणेच या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची सागवानापासून साकारलेल्‍या सुवर्णरथातून रथयात्रा काढण्‍यात आली.

या सोहळ्‍यासाठी झारखंड येथील पू. प्रदीप खेमका, पू. (सौ.) सुनीता खेमका, दिल्ली येथील पू. संजीवकुमार, ‘पितांबरी’ उद्योगसमुहाचे श्री. रवींद्र प्रभुदेसाई आणि कर्नाटक येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी मनोगत व्‍यक्त केले. तर या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा संघचालक श्री. राजन भोबे, म्हार्दाेळ येथील श्री महालसा मंदिरांचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद कामत, गोमंतक संत मंडळाचे संचालक ह.भ.प. सुहास बुवा वझे, गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष श्री. भाई पंडित आणि कोकणी साहित्यिक महेश पारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्‍या प्रारंभी वर्ष 2021 मध्‍ये झालेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा लघुपट दाखवण्‍यात आला. त्‍यानंतर काढण्यात आलेल्‍या रथयात्रेत धर्मध्‍वज, मंगलकलश घेतलेल्‍या सुवासिनी, ध्‍वजपथक, टाळपथक इत्‍यादी ‘श्रीमन्नारायण नारायण…’ या धुनीवर मार्गक्रमण करत होते. सुवर्णरथात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासह त्‍यांच्‍या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ विराजमान झाल्या होत्या. या वेळी नृत्‍यपथकाने ‘अच्‍युताष्‍टकमा’वर आधारित नृत्‍य सादर केले. त्‍यानंतर ‘आत्‍मारामा आनंदरमणा’ हे गीत सादर करण्‍यात आले. आभारप्रदर्शन आणि रथदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत सनातन संस्थेद्वारे देशभरात ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गंत आतापर्यंत अनेक प्राचीन मंदिरांची स्वच्छता, शेकडो मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना, प्रवचने आणि अनेक ठिकाणी ‘हिंदु एकता दिंडीं’ काढण्यात आल्या. या सर्व उपक्रमांत हजारो हिंदूंनी सहभाग घेतला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.