प्रतिष्ठा न्यूज

देगलूर येथे शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.25 : मराठवाडा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मराठवाडा संपर्क प्रमुख तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते श्री बबनराव थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर जि.नांदेड येथे दि.27 ऑक्टोबर 2022 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व बेरोजगारांसाठी रोजगार भरती मेळावा शिवसेना नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख माश्री बबनराव थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नगरेश्वर मंगल कार्यालय तळगल्ली, देगलूर येथे दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात इयत्ता 8,9,10 पास अथवा नापास असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुरक्षा रक्षक व पदवी धर युवकांना सुपरवायझर या पदासाठी भरती मेळावा आहे तरी सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या मेळाव्यात शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन सहभागी होऊन या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे देगलूर तालुका प्रमुख महेश पाटील, शिवसेना युवा कार्यकर्ते श्री भागवत पाटील सोमुरकर यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.