प्रतिष्ठा न्यूज

जाकापूर ता.कंधार येथील प्रसिद्ध किर्तनकार हभप सदाशिव महाराज शिरसे यांचे निधन

प्रतिष्ठा न्यूज/जिल्हा प्रतिनिधी
नांदेड : कंधार तालुक्यातील मौजे जाकापूर येथील रहिवासी तथा प्रसिद्ध किर्तनकार हभप सदाशिव शावजी शिरसे (वय 90) यांचे अल्पशा आजाराने सोमवार दि.24/10/2022 रोजी रात्री ठिक 9:30 वा.दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिव देहावर मंगळावर दि.25/10/2022 रोजी दुपारी ठिक 2:00 वा.अंत्यसंस्कार त्यांच्या राहत्या गावी जाकापूर येथे करण्यात येणार आहेत.
संत हभप. वै.सदाशिव महाराज जाकापूरकर हे वैष्णव संप्रदायातील विठ्ठलाचे नि: सीम भक्त होते. त्यांनी आतापर्यंत हजारो किर्तने केली असून किर्तनाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती केली आहे.ते दरवर्षी पायी दिंडी वारीने पंढरपूर यात्रा करीत असत. यावर्षी सुद्धा त्यांनी पंढरपूर पायी वारी केली होती.त्यांच्या आकस्मिक निधनामुळे अनेकांनी तिव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,भाऊ,सुना,नातू,पणतू असा परिवार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.