प्रतिष्ठा न्यूज

रेशन दुकानातील तांदळाच्या पोत्यात आढळली खाल्लेली स्टार पुडी : धक्कादायक प्रकार उघडकीस

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.१ : तालुक्यातील एका रेशन दुकानांमध्ये धान्यवाटप होत असताना दुकानातील एका तांदळाच्या पोत्यात स्टार गुटखा खाल्लेली पुडी आढळून आल्याने रेशन लाभार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. रेशन दुकानदारास विचारले असता ते म्हणाले की, ” ही पोती काही आमच्याकडून पॅक होत नाही तर ती जिल्हा रे शन धान्य अन्नपुरवठा विभागाकडून पॅकिंग होऊन येत असतात. घडलेल्या घटनेबाबत आम्ही अन्नपुरवठा विभागाला कळवू”.
गगनबावडा तालुका हा अतीदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील जनतेची आर्थिक परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नाही. अनैक लोकांचा उदरनिर्वाह हा शेती वर अवलंबून असतो. तालुक्यात पाऊस जास्त प्रमाणात पडत असल्याने शेतीही म्हणावी तशी पिकत नाही. त्यामुळे आधार मिळतो तो सरकारी रेशनच्या मिळणाऱ्या धान्याचा. पण ते सरकारी धान्य जर निकृष्ट दर्जाचे येत असेल तर सामान्य लोकांनी जगायचे कसे ?

जिल्हा धान्य रेशन अन्नपुरवठा विभाग व गगनबावडा अन्नपुरवठा विभागाने याकडे लक्ष देऊन लोकांना चांगल्या दर्जाचे धान्य द्यावे अशी रेशन लाभार्थ्यातून मागणी होत आहे .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.