प्रतिष्ठा न्यूज

जी.के.ऐनापुरे यांच्या ” अवकाश ‘या पहिल्या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे सांगलीत शुक्रवारी प्रकाशन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली /प्रतिनिधी : प्रख्यात साहित्यिक,विचारवंत प्रा.जी.के.ऐनापुरे यांच्या ” अवकाश ‘या पहिल्या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन शुक्रवार दिनांक २६ मे २०२३ रोजी दुपारी ५:०० वाजता महात्मा गांधी वाचनालय सांगलीच्या सभागृहात होणार आहे. अशी माहिती प्रगतिशील लेखक संघाचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिली.
‘अवकाश’ या कादंबरीची पहिली आवृत्ती १९९७ साली प्रकाशित झाली होती. वाचकांना या कादंबरीची प्रत मिळत नसल्याने व वारंवार विचारणा होत असल्याने शब्द पब्लिकेशन मुंबई यांच्या वतीने हार्ड बाउंड बईंडींग मध्ये अतिशय आकर्षक पद्धतीने प्रकाशित करण्यात येत आहे. एका चित्रकाराच्या आयुष्यावर बेतलेली ही कादंबरी असल्याने या नव्याआवृत्तीचे प्रकाशन सांगलीतील प्रथितयश चित्रकार मिलिंद कडणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत बाबर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर राहुल सूर्यवंशी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. शब्द पब्लिकेशन मुंबई, प्रगतिशील लेखक संघ सांगली, म.गांधी वाचनालय सांगली यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रा.जी.के.ऐनापुरे यांचे खंगोल (२०१०), निकटवर्तीय सूत्र (२०१७) हे कथासंग्रह ,कांदाचिर (२००५), स्कॉलर ज्युस (२०१२), झिंझुरडा (२०१५) घनसाळ (२०१७) चिंचपोकळी (२०१९) नासमाया (२०२३) हे दीर्घकथासंग्रह ,अवकाश (१९९७), अभिसरण (२००२), अधुरा (२००६) रिबोट (२००८), जाईच्या घरी जाई (२०१०), ओस निळा एकान्त (२०२२) या कादंबऱ्या तर ग्रेसची कविता अर्थबोधाचे तपशील (२०१५) मराठी कथा मूल्य आणि हास (२०१६)चारुता सागर दुःखाचा गिरव (२०१९) सूर्याचे सांगाती (२०२१ / बाबुराव बागूल यांच्या असंग्रहित कथा / संपादन) समीक्षाग्रंथ इत्यादी साहित्य प्रकाशित असून सार्वजनिक वाचनालय, नाशिक मराठी कथेतील योगदानासाठी पुरस्कार (२०११) रिबोट, महाराष्ट्र फाऊंडेशन (२०१०) बाबुराव बागुल पुरस्कार (२००९)शब्दवेध सन्मान (२००८) कांदाचिर शंकरराव खरात पुरस्कार (२००५)जाईच्या घरी जाई. डॉ. भाऊसाहेब नंदुरकर पुरस्कार (२०११) राज्य पुरस्कार (२०१ ) इत्यादी पुरस्काराने सन्मानित ऐनापुरे यांच्या रिबोट, या कादंबरीचा कन्नड अनुवाद सृष्टी प्रकाशन, बेंगलोर (२०१०) यांनी प्रकाशित केला आहे. प्रा. ऐनापुरे यांनी मळणगांव येथील दुसरे ग्रामीण साहित्य संमेलन (२००३) दुसरे मराठी साहित्य संमेलन, कापूसखेड, इस्लामपूर (२०१२) २३ वे विभागीय मराठी साहित्य संमेलन, महाराष्ट्र साहित्य परिषद व राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी इस्लामपूर (२०१४) वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग येथील फुले, आंबेडकरी साहित्य संमेलन (२०१७) ७ वे आखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन पुणे (२०१९) इत्यादी महत्त्वाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.महाराष्ट्र बृहनमहाराष्ट्रातही प्रा. ऐनापुरे यांचे वाचक मोठ्या संख्येने असून सध्या ते प्रगतिशील लेखक संघाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. अतिशय महत्त्वाच्या कादंबरी प्रकाशासाठी वाचक रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.