प्रतिष्ठा न्यूज

एमएसईबी वाढीव अनामत रक्कम ; बीलाची घरोघरी होळी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : वीजवितरण कंपनीने या महिन्याच्या बीलाबरोबर वाढीव अनामत रकमेची बीले विग्राहकांना पाठवली आहेत. त्याची आज घरोघरी होळी करण्यात आली.
वीजवितरण कंपनीने ग्राहकांच्या मागणीनुसार वीज जोडत असताना अनामत रक्कम घेतलेली असते. त्यावर पाच टक्के व्याज द्यायचे आहे. त्याबद्दल वीजवितरण कंपनी काहीही बोलत नाही. उलट ग्राहकाकडूनच ज्यादाची रक्कम कंपनी उकळत आहे. याला आमचा विरोध आहे. म्हणून आज सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने आज घरोघरी विजबीलाची होळी करण्याचे अवाहन करण्यात आले होते. त्यास आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वीजवितरण कंपनीने सदरची बीले पाठीमागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत.
सतीश साखळकर उमेश देशमुख तानाजी रुईकर रत्नाकर नांगरे रवींद्र यादव रियाज जमादार हे प्रबोधन करीत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.