प्रतिष्ठा न्यूज

महिलांसाठी मोफत मधुमेह आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबीर

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुका कला मंच, गगनबावडा युवती मंच व ग्रामपंचायत गगनबावडा यांच्या संयुक्त विद्यमाने गगनबावड्यातील रामेश्वर मंदिर येथे १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या महिलांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गारीवडे यांच्या विशेष सहकार्याने महिलांसाठी मोफत शुगर आणि हिमोग्लोबिन (HB) तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.या शिबिरासाठी महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सिस्टर वंदना भिसे, सागर कुंभार यांनी शिबिर पार पाडले.
गगनबावडा सरपंच सौ. मानसी कांबळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य वृंदा पाध्ये, युवती मंच अध्यक्षा वैदेही पाध्ये, विद्या कोठावळे, अंजली सावंत, मंगल भांबूरे, आशा सेविका रंजना गवळी, सुनीता अडुळकर, तंटामुक्त अध्यक्ष भगवान सावंत, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ कांबळे, गिरीश प्रभुलकर, गणपतराव भांबुरे, धनाजी शिंदे, जावेद आत्तार,प्रकाश खाटके, दत्तात्रय ओझर्डेकर, सुधीर नर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या शिबिरास नियाझ शेख, कलामंच संस्थापक विनोद प्रभूलकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.