प्रतिष्ठा न्यूज

संत नामदेव महाराज मठ संस्थान मौजे बारूळ ता.कंधार येथे सामुदायिक सर्व धर्मीय मोफत विवाह सोहळ्याचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
 नांदेड : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज मठ संस्थान मौजे बारूळ ता.कंधार  च्यावतीने यंदाही अखंड हरिनाम सप्ताह व सामूहिक विवाह सोहळा दिनांक 02/05/2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे, तरी सर्व इच्छुकांनी या संधींचा अवश्य लाभ घ्यावा. या विवाह सोहळ्यात सर्व धर्मीय सामूदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. धार्मिक कार्यक्रम त्या,त्या धर्मानुसार आयोजित केला जात असतो.तरी या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन समस्त गावकरी मंडळी बारूळ यांनी केले आहे.
     विवाह सोहळ्यासाठी लाखो रूपये खर्च केले जातात. कर्ज काढून पैसे खर्च केला जात असतो. सर्वसामान्य लोकांना लग्नाचा खर्च परवडत नाही. आज समाजाला सार्वजनिक विवाह सोहळा आयोजित करणे नितांत गरजेचे आहे.
       आजच्या महागाई च्या काळात काटकसर करणे आवश्यक बाब झाली आहे. शासनाने सुद्धा यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.सर्वसामान्य,गरीब लोकांसाठी संत  नामदेव महाराज मठ संस्थानाच्या वतीने आतापर्यंत हजारो विवाह मोफत उत्तम रित्या आयोजित करण्यात आले आहे. विशेषतः या सार्वजनिक विवाह सोहळ्यात
वधू वरास कपडे, मनी मंगळसूत्र, विवाह विधीसाठी लागणारे सर्व साहित्य व कन्यादान म्हणून 13000 रुपये नगदी स्वरूपात संस्थांकडून देण्यात येणार आहे. अन्नदान ,भोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. विवाह सोहळ्यासाठी नोंदणी निशुल्क राहील. तरी परिसरातील इच्छूक वधू– वरांनी  विवाह नोंदणी करावी असे आवाहन संत नामदेव महाराज आणि समस्त गावकरी मंडळ बारूळ यांनी केले आहे.
विवाह स्थळ :- बारूळ तालुका कंधार जि. नांदेड
बारूळ
संपर्कासाठी :- ग्रामपंचायत कार्यालय बारूळ,
संत श्री नामदेव महाराज मठ संस्थान बारूळ,
मोबाईल नंबर :- 9850169179, 9421759168,8698761176
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.